Home Latest News स्टार्टअपद्वारे ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्याची गरज – राज्यपाल जिष्णू देव...

स्टार्टअपद्वारे ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्याची गरज – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

0

<p><strong>&CenterDot; &OpenCurlyQuote;स्टार्टअप फ्रंटियर 1&period;0’ कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> ज्ञानाचे नाविन्यपूर्ण उपाययोजनांमध्ये&comma; आव्हानांचे संधींमध्ये आणि कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता हीच आजच्या आर्थिक प्रगतीची खरी ताकद आहे&period; त्यामुळे विद्यापीठांनी केवळ पदवी प्रदान करणाऱ्या संस्था न राहता नवोपक्रम&comma; बौद्धिक संपदा&comma; स्टार्टअप्स आणि समाजपरिवर्तन घडविणाऱ्या केंद्रांमध्ये विकसित व्हावे&comma; असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कौशल्य&comma; रोजगार&comma; उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व आय स्पार्क फांऊडेशनमार्फत आयोजित &OpenCurlyQuote;स्टार्टअप फ्रंटियर 1&period;0’ या दिवसभराच्या परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले&period; यावेळी कौशल्य&comma; रोजगार&comma; उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा&comma; अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा&comma; रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ&period; अपूर्वा पालकर&comma; एचपी इंडियाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता&comma; कौशल्य विकास आयुक्त डॉ&period; अमित सैनी&comma; राज्यपालांचे सचिव डॉ&period; प्रशांत नारनवरे&comma; राज्यपाल सचिवालयाचे सहसचिव एस&period; राममूर्ती&comma; महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ&period; श्रीकांत पाटील&comma; व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी&comma; विद्यापीठाचे कुलसचिव डॉ&period; वैभव नारवडे&comma; तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर&comma; गुंतवणूकदार&comma; मार्गदर्शक&comma; उद्योजक&comma; स्टार्टअप्स&comma; प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते&period; यावेळी राज्यपालांच्या हस्ते मेडिकल लॅब आणि एचपी क्रिएटिव्ह गॅरेज लॅब यांचे उद्घाटन करण्यात आले&period; यावेळी कुलगुरु डॉ&period; अपूर्वा पालकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश वाचून दाखवला&period;<img class&equals;"alignnone wp-image-54493 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;स्टार्टअपफ्रंटियर1&period;0कार्यशाळेचेराज्यपालयांच्याहस्तेउद्घाटन4&lowbar;copy&lowbar;800x512&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"512" &sol;><&sol;p>&NewLine;<p>राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की&comma; भारतात कल्पकता आणि नवोपक्रमांची कमतरता नाही&comma; मात्र या नवकल्पनांचे समाजोपयोगी उपाययोजना आणि यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे&period; या दृष्टीने &OpenCurlyQuote;स्टार्टअप फ्रंटियर 1&period;0’ सारखे व्यासपीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल&period; सिंगापूर&comma; इस्रायल आणि स्वित्झर्लंड यांसारख्या देशांकडे विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती नसतानाही त्यांनी मानवी भांडवल&comma; तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांच्या बळावर जागतिक प्रगती साधली आहे&period; भविष्यात विद्यापीठांची ओळख त्यांनी निर्माण केलेल्या नवोपक्रमांवर&comma; बौद्धिक संपदेवर&comma; प्रोत्साहन दिलेल्या स्टार्टअप्सवर आणि समाजावर झालेल्या सकारात्मक परिणामावर ठरेल&period;विकसित भारताचा अर्थ केवळ आर्थिक समृद्धी नसून सर्वांच्या सर्वांगीण विकासाशी तो जोडलेला आहे&period; &OpenCurlyQuote;सर्वे भवन्तु सुखिनः&comma; सर्वे सन्तु निरामयाः’ या भारतीय तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेत सर्वसमावेशक&comma; न्याय्य आणि समान संधी देणारा समाज घडविण्याची आवश्यकता आहे&period; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला &OpenCurlyQuote;सबका साथ&comma; सबका विकास&comma; सबका विश्वास&comma; सबका प्रयास’ हा मंत्र घोषवाक्य केवळ नसून देशाच्या विकासाचे व्यापक ध्येय असल्याचे सांगून राज्यपाल वर्मा म्हणाले की&comma; समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कौशल्य विकास&comma; उद्योजकता आणि नवोपक्रमांचे लाभ पोहोचले पाहिजेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>स्टार्टअप फ्रंटियर 1&period;0 &colon; नवोपक्रमाला चालना देणारा उपक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संदेशात म्हणाले की&comma; रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत उल्लेखनीय प्रगती केली असून&comma; उद्योगाभिमुख शिक्षण&comma; कौशल्य विकास&comma; रोजगारक्षमतेत वाढ&comma; उद्योजकता प्रोत्साहन आणि नवोपक्रमाधारित उपक्रमांच्या माध्यमातून ६१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम घडविला आहे&period; एमएसएसयूआयआर्क फाउंडेशन&comma; इन्क्युबेटर यांसारख्या उपक्रमांमुळे नवउद्योजकआणि युवा नवोपक्रमकर्त्यांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत&period; आयआयटी मद्रास प्रवर्तक यांच्याशी झालेल्या भागीदारीतून विद्यार्थ्यांना डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑपरेशन्स विषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे&period; तसेच एचपी गेमिंग गॅरेज आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी प्रयोगशाळेच्या उद्घाटनामुळे विद्यार्थ्यांना उदयोन्मुख उद्योगांच्या गरजांनुसार अत्याधुनिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होईल&period; &OpenCurlyQuote;विकसित महाराष्ट्र २०४७’ या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना नवोपक्रम&comma; स्टार्टअप्स आणि उद्योजकता हे आर्थिक विकासाला गती देणे&comma; रोजगारनिर्मिती करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>स्टार्टअप चळवळ प्रत्येक गावापर्यंत पोहचवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>कौशल्य&comma; रोजगार&comma; उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की&comma; स्टार्टअप चळवळ ही केवळ काही शहरांपुरती किंवा विशिष्ट वर्गापुरती मर्यादित न राहता ती राज्यातील प्रत्येक गावापर्यंत&comma; विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागापर्यंत पोहोचली पाहिजे&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप संस्कृती रुजविण्याचे काम सुरू असून&comma; त्यासाठी उद्योग&comma; शैक्षणिक संस्था&comma; गुंतवणूकदार आणि समाजाच्या सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे&period;महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील आघाडीचे स्टार्टअप केंद्र बनविण्यासाठी ही चळवळ घराघरात पोहोचविण्याचा शासनाचा निर्धार आहे&period;<img class&equals;"alignnone wp-image-54494 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;स्टार्टअपफ्रंटियर1&period;0कार्यशाळेचेराज्यपालयांच्याहस्तेउद्घाटन3&lowbar;copy&lowbar;800x513&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"513" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>६० महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू &colon; अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा वर्मा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की&comma; महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून स्टार्टअप वीक&comma; स्टार्टअप यात्रा&comma; हॅकाथॉन आणि इनोव्हेशन चॅलेंजेस यांसारख्या उपक्रमांतून राज्यभरातील युवकांना संधी दिली जात आहे&period; राज्य शासनाकडून पेटंटसाठी आर्थिक सहाय्य&comma; इन्क्युबेटर्सना बळकटी&comma; प्रादेशिक नवोपक्रम केंद्रे आणि विद्यापीठांमधील नवोपक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे&period; रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने ६० महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू करून विद्यार्थ्यांना उद्योग&comma; गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे&period; आयआयटी मद्राससोबतच्या सामंजस्य करारामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर व ऑपरेशन्स विषयातील प्रमाणित प्रशिक्षण मिळणार असून त्यासाठी सीएसआरचा निधी उपलब्ध होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>विद्यार्थ्यांच्या कल्पनांना दिशा देणारी परिसंस्था उभारणार &colon; कुलगुरू डॉ&period; अपूर्वा पालकर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>डॉ&period; अपूर्वा पालकर म्हणाल्या की&comma; प्रयोगशाळा उभारणे&comma; प्रोटोटाइप आणि पुढे स्टार्टअपपर्यंत विद्यार्थ्यांच्या कल्पनांना दिशा देणारी परिसंस्था उभारणे ही काळाची गरज आहे&period;महाराष्ट्र शासनाने अॅनिमेशन&comma; व्हिज्युअल इफेक्ट्स&comma; गेमिंग&comma; कॉमिक्स &lpar;एवीजीसी&rpar; तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता &lpar;एआय&rpar; क्षेत्रात पुढाकार घेतला आहे&period; &OpenCurlyQuote;महा एआय शाळा’ उपक्रम आणि एचपी क्रिएटर्स गॅरेज लॅब्समुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळून भविष्यातील नवोन्मेषक आणि उद्योजक घडतील&comma; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&OpenCurlyQuote;एचपी क्रिएटर्स गॅरेज लॅब्स’मधून विविध क्षेत्रांत प्रशिक्षण&colon; इप्सिता दासगुप्ता<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>इप्सिता दासगुप्ता म्हणाल्या की&comma; मुंबईतील भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था &lpar;आयआयसीटी &rpar; आणि &OpenCurlyQuote;महा एआय शाळा’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण व प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे&period;&OpenCurlyQuote;एचपी ड्रीम्स अनलॉक्ड’ उपक्रमाद्वारे ४&period;५ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे&period;राज्य शासनाच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या &OpenCurlyQuote;एचपी क्रिएटर्स गॅरेज लॅब्स’मधून गेम डिझाइन&comma; एआय&comma; सायबर सुरक्षा&comma; कोडिंग आदी क्षेत्रांत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण&comma; हॅकाथॉन आणि प्रकल्पाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि आयआयटी मद्रास यांच्यात सामंजस्य करार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि आयआयटी मद्रास यांच्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उद्योग-संबंधित कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला या अंतर्गत ऑनलाइन शिक्षण&comma; प्रमाणपत्र&comma; इंटर्नशिप आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल&period; &&num;8216&semi;व्हर्टिव्ह&&num;8217&semi; या कंपनीच्या सीएसआर निधीतून एक मोफत कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला जात आहे&period; महाराष्ट्रातील १५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षत करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे&period; कॉम्प्युटर सायन्स&comma; इलेक्ट्रिकल&comma; इलेक्ट्रॉनिक्स&comma; मेकॅनिकल या शाखेतील २०२६ या वर्षा मध्ये उत्तीर्ण झालेले आणि २०२७ मध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थ्यी यांचा यामध्ये समावेश असेल&period; डेटा सेंटर ऑपरेशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट&period;&comma;क्रिटिकल पॉवर आणि कूलिंग सिस्टीम्स&comma;भौतिक सुरक्षा प्रणाली&comma;ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स पद्धती व उद्योग मानके या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल&period;या प्रशिक्षणांमुळे डेटा सेंटर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळतील&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>उदयोन्मुख क्षेत्रांतील स्टार्टअप्सचा प्रदर्शनात सहभाग<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>स्टार्टअप प्रदर्शनामध्ये कृषी&comma; शिक्षण&comma; फिनटेक&comma; डीपटेक&comma; कृत्रिम बुद्धिमत्ता &lpar;एआय&rpar;&comma; मशीन लर्निंग &lpar;एमएल&rpar; तसेच इतर उदयोन्मुख क्षेत्रांतील स्टार्टअप्सनी विकसित केलेली नाविन्यपूर्ण उत्पादने आणि तंत्रज्ञानाधारित उपाय सादर करण्यात आले या कार्यक्रमात स्टार्टअप मार्गदर्शन विषयांवरील परिसंवाद पार पडले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version