spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शेतकऱ्यांच्या दुबार पेरणी संकटांवर शासनाने तातडीने उपाययोजना करावी.

 

पुरामुळे धानोरा, रोहणी, दापोरी, येवती येथील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या त्यांचे पंचनामे करावे

युवा ग्रामीण पत्रकार संघटना यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर

यवतमाळ 1 : शेतकऱ्या वर आत्म चिंतनाची वेळ आली आहे, शेतकरी हा आशे वरच जगत आहे परंतु आशे ची निराशाच होतं आहे, एकीकडे हवामान खात्याच अंदाज, सांगतात 10 जून, 12 जून, 14 पासून पाऊस आहे, असे हवामान खाते अंदाज देतात मात्र यावेळी हवामान अदांज फोल ठरले,शेतकऱ्यांचे शेत तयार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली, पेरणी केल्या नंतर वरून राजाने तुटक तुटक प्रमाणात पाऊस आल्याने 75%पेरणी ही विस्कळीत झाली, भरीत भर म्हणून अंगाला व्याधी, तसेच एन लागवडी नंतर वन्य प्राण्याने नासाडी केली यामध्ये जंगली डुकरं, रोई, (नीलगाई ) वानर, यांनी सदर तुरीचे तास धरून, एका टोका पासून ते दुसऱ्या टोका पर्यंत नासाडी केली, तुरीच्या तासाची, व कापूस पिकांची नासाडी केली, शेतकऱ्याने आणखी किती भार सोसायचा, एकीकडे, बी, बियाणे, खते, महागडे असून, शेतकरी बळीराजा बळी पडलेला आहे, त्यातल्यात्यात दि 26 जुनला झालेल्या अती मुसळधार पावसाने राळेगाव तालुक्यातील धानोरा, रोहिणी, येवती,परीसरातील जमीनी खरडून नेल्या मात्र याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही किंवा शासनाने पंचनामे सुद्धा केले नाही,सदर शासनाने, गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे मात्र याकडे जाणीव पुर्वक दुलक्ष करीत आहे.

त्याच प्रमाने शासनाने वन विभागास थेट परवानगी देऊन एकतर शेतकऱ्यांच्या शेताला  कुंपण करावे सदर शासनाला माहित असताना सुद्धा, शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत माथ्यावर मारतात, परंतु हा पर्याय नाही, सदर शेतकऱ्यांच्या शेताला, वन्य प्राण्या पासून शेतीचे पिकाचे, मालाचे, सरक्षण होईल, असा पर्याय शासनाने ताबडतोब निर्णय घेणे गरजेचे आहे, कारण ही पिकाची सुरुवात आहे, पीक निघे पर्यंत 50%माल घरी येतो की नाही, हे देखील सांगता येत नाही, हे कुठं तरी शासनाने थांबवलं पाहिजे, आणि थेट शेतकऱ्यांच्या शेतात ला, कुंपण करणे आवश्यक आहे, शेतकऱ्यां वरती दुबार पेरणीचे संकट आहे, सोसायट्या बँका थकीत असल्या मुळे शेतकऱ्यांना सावकारा कडून अव्याचे सव्वा कर्ज घेऊन शेतकरी दुबार  पेरणीच्या संकटात सापडला असून, बियाणे व खताचे नियोजन लागत नाही, करिता शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी अर्थ सहाय्य करण्यात यावे,  यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या वाढतील असे संकेत दिसत आहे शासना मध्ये बलाढ्य राजकारणी असल्यामुळे आणि शेतकरी असल्यामुळे जर शेतकऱ्यांची जाण असेल, तर हा निर्णय ताबडतोब मार्गी लावून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, व जिथे पुरामुळे जमीनी खरडून गेल्या तेथील शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून मदत देण्यात या..


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.