spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बिसलेरी किंवा बाजारात मिळणाऱ्या पाण्यावरील शुध्दतेची बंधने आयएसआय मार्क सक्तीचे नाही.. .

नागपूर :- बाजारात पिण्याच्या पाण्यावरील शुध्दतेची बंधने किंवा आयएसआय मार्क गेल्या वर्षभरापासून सक्तीचे नाही अशी धक्कादायक माहिती भारतीय मानक ब्युरोचे वैज्ञानिक ई. नागपूर कार्यालयाचे प्रमुख हेमंत बी आडे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतांना दिली. ग्राहकांसमोर असणाऱ्या विविध समस्यां संदर्भात आज अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य गजानन पांडे, नागपूर जिल्हा आणि महानगरचे कार्यकारी अध्यक्ष संजय धर्माधिकारी, नागपूर जिल्हा अध्यक्ष गणेश शिरोळे, महानगर अध्यक्ष अनिरुध्द गुप्ते, सचिव प्रकाश भुजाडे आणि राजीव पुसदेकर आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी बोलतांना आडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात वरील माहिती दिली. यावेळी अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. पण या संदर्भात ते म्हणाले उन्हाळयात पाणी थंड व्हावे म्हणून खाजगी विक्रेते केमिकलचा उपयोग कॅनमध्ये करतात जे केमिकल प्रकृतीला हानीकारक असते, याशिवाय बंद बाटल्या किंवा कॅन या पाण्याच्या शुध्दतेसाठी देखील आयएसआय मार्कची गरज सक्तीची नाही. त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही याबाबतचे आमचे अधिकार काढण्यात आले आहेत व आमच्या लायसन्स (परवान्याची) गरज ठेवली नाही हे आता एफएसएसआय दिले आहे, त्याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. सोन्या, चांदीच्या संदर्भात घडनावळीचा (Making Charges) खर्च सोन्याच्या किंवा चांदीच्या किंमतीवर लावणे चुकीचे आहे, हा निव्वळ व्यावसायिक प्रकार झाला. मात्र या संदर्भात आमचे नियंत्रण नाही, सोने किंवा चांदीच्या दागिन्यांवर प्रति दागिना ४५ रुपये खर्च आम्ही हॉल मार्किंगसाठी लावतो, सोन्याची किंमत, अधिक घडणावळ या एकूण रकमेवर जीएसटी आकारला जात असेल तर तेही धक्कादायकच आहे असे ते म्हणाले, यावर आमचे नियंत्रण नाही हे त्यांनी स्पष्ट केले. घरगुती गॅसचे रेग्युलेटरवर आयएसआय सक्तीचे आहे, बाजारात रेग्युलेटर उपलब्ध होत असतील तर त्यावर आमचे नियंत्रण नाही. सिलेंडरवरही आयएसआय मार्क सक्तीचे आहे. बांधकामात उपयुक्त असणारे सिमेंट आयएसआय मार्क असणे आवश्यक आहे. ISI मार्क नसलेले सिमेंटवर आम्ही कारवाई करु शकतो. इलेक्ट्रॉनिक वस्तुंवरही आयएसआय मार्क आवश्यक आहे सक्तीचे आहे. खाण्याचे तेलाबाबत आयएसआय मार्क सक्तीचे नाही, एगमार्क आवश्यक आहे. त्याची तपासणी होत नाही. इलेक्ट्रिक गिट्टारला आयएसआय सक्तीचे असायला हवे, सीएसओ प्रॉडक्टस्ला आयएसआय सक्तीचे आहे, अनेकदा पोलिसांच्या मदतीने आम्ही कारवाया देखील करतो आणि त्यासाठी थेट न्यायालयात प्रकरण दाखल करतो, असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात स्पष्ट केले. कार्याध्यक्ष संजय धर्माधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.

Popular Articles