spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नगरपरिषदेने गरजु, अपंग, विकलांग व बेघराना पट्टे व घरकुल योजनांचा लाभ त्वरित द्यावा

 
निवडणुकीपूर्वी केवळ जाहिरातबाजी न करता अंमलबजावणी करण्याची मागणी.  
 
सामाजित कार्यकर्ते प्रशांत मसार यांची मागणी. 
 
कन्हान २८ : – नगरपरिषद क्षेत्रात गेल्या काही आठवड्या पासुुन विविध शासकीय योजनांची जाहिरात, पत्रकबा जी करून प्रसार करण्यात येत आहे. हे सर्व करण्या मागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुकां च्या पार्श्वभुमिवर करण्यात येत आहे का ? या योजने चा गाजावाजा न करता शासकीय योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी. अशी मागणी कन्हान नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक घोडके यांचे मार्फत जिल्हाधिकारी नागपुर यांना प्रशांत मसार यांनी निवेदन देऊन केली आहे.
          कन्हान-पिपरी नगरपरिषद हद्दीत गेल्या काही आठवड्या पासुन विविध शासकीय योजनांची जाहि रात, प्रचारबाजी, पत्रके, बॅनर्स व सोशल मीडियावर प्रसार सुरू आहे. हे सर्व कार्य स्थानिक स्वराज्य संस्थे च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवळ जनतेला आक र्षित करण्याच्या हेतुने करण्यात येत आहे का ? मागि ल दहा वर्षापासुन मूलभुत नागरी समस्या मार्गी लाव ण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. आठवडी बाजार रस्त्यावर भरतो. बाजार भरण्याकरता अद्याप जागा उपलब्ध नाही. नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरव ठा नाही, प्रवाशासाठी बस स्टॉप नाही, विंकलाग व अपंग कुटुंबियांना पट्टे वाटप नाही, लहान व्यापाऱ्याचे पुनर्वसन नाही. तसेच वेकोलीच्या मनमानी कारभा रावर कोणताही अंकुश लावण्यात आलेला नाही.अशा अनेक समस्या नागरिकांसमोर ठाकल्या असताना गेल्या अनेक वर्षांपासुन केवळ कागदपत्रांची मागणी करून गरजुंना भ्रमित करण्याचा प्रकार सुरू आहे. म्हणुनच निवडणुकीचा कालखंड न येता, आजही जे खरोखर गरजु आहेत. अपंग, विकलांग, बेघर कुटुंबा ना तत्काळ पट्टे व घरकुल योजनेचा लाभ प्रत्यक्षात देण्यात यावा. अन्यथा हे सर्व केवळ निवडणुकी पूर्वी चा “देखावा” व “दिशाभुल” ठरेल. करिता योजनेचा गाजावाजा न करता शासकीय योजनांची प्रशासनाने तातडीने पारदर्शक व गरजु व्यक्तींना न्याय देणारी अंमलबजावणी करावी. आणि निवडणुकी पूर्वी केवळ जाहिरातबाजी न करता अंमलबजावणी करून सत्तेचे राजकारण बाजुला ठेवुन सामान्य जनतेच्या जीवनमा नाचा खरा कायापालट प्रशासनाच्या कृतीतुन दिसुन यावा. अशी मुलभुत सोयीसुविधेची न्यायिक मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार यानी नागरिकांच्या वतीने  विपीनजी इटनकर साहेब, जिल्हाधिकारी नागपुर हयाना  दीपक घोडके मुख्याधिकारी नगरपरिषद कन्हान-पिपरी यांचे मार्फत निवेदन देऊन केली आहे. तसेच  श्यामकुमार बर्वे खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र हयाना महितीस व योग्य कारवाईस प्रतिलिपी देण्यात आली आहे.

Popular Articles