spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गादा ग्रामपंचायत महीला सदस्य बहीनीच्या खूण प्रकरणातील गूढ रहस्य अजूनही कायमच

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील गादा गावातील घोरपड शिरपूर मार्गावर काल रात्री एका विवाहित महिलेचा धारदार शस्त्राने निर्घृण खूण केल्याची घटना काल(2 जुलै )रात्री 8 वाजता निदर्शनास आली असून खून झालेल्या महिलेच्या शरीरावर 24 च्या जवळपास तीक्ष्ण धारदार शस्त्राचे घाव असल्याचे सांगण्यात येत असून मृतक महिलेचे नाव भाग्यश्री राजेंद्र कोटरुंगे वय 45 वर्षे रा गादा तालुका कामठी असे आहे.मृतक ही गादा ग्रामपंचायत च्या महिला सदस्य सरिता अशोक खुरपडी यांची बहीण असून या खून प्रकरणात मृतकच्या पहिल्या पतीवर पूर्ण संशय बळकावण्यात येत आहे तसेच घटनास्थळावर कुठलेही शस्स्त्र वा पुरावे न मिळाल्याने या खून प्रकरणाचे गूढ रहस्य अजूनही कायमच आहे.पोलिसांनी तुर्तास घटनेची नोंद करीत अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. …पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महिला ही कामठी रोड वरील आझरी माझरी येथील माहेरची रहीवासी होती.हिला तीन बहिणी व एक भाऊ आहे.मृतक महीलेचे सन 2010मध्ये जबलपूर रहिवासी विनोद रजक सोबत प्रेमविवाह केला होता.तिला पती विनोद रंजक पासून 15 वर्षांची मुलगी गुंजन रजक व 12 वर्षाचा आदित्य रंजक नामक मुलगा आहे.हे दोघेही पती पत्नी कंपनीत काम करून आझरी माझरीत वास्तव्यास होता.पत्नीवर होत असलेल्या चारित्र्यसंशयातून सन 2017 मध्ये पती पत्नी वेगळे झाले मृतक भाग्यश्री नवऱ्याला सोडून मुलांना घेऊन माहेरी भावाच्या आधाराने एका टिनाच्या झोपडित राहत होती.त्यानंतर 2023 मध्ये मुलांना वडिलाचा आधार व्हावा म्हणून तारसा कन्हान येथील नांदगाव येसांबा रहिवासी राजेंद्र कोत्रूंगे सोबत मंदिरात लग्न करून नंदनवन येथे राहत होते.मात्र काही महिन्यानंतर मृतक चा दुसरा पती राजेंद्र ने दारू पिऊन येऊन मारझोड करायचा व पत्नी सह मुला मुलींना ही अश्लील शिवीगाळ द्यायचा .दोन अडीच वर्षे असेच त्रासदायक दिवस निघाल्यानंतर पती च्या मूळ गावी वाघोली येथे चार महिने राहली.मात्र चारित्र्य संशयातून वाद वाढीवर असल्याने मृतक ही काही दिवस रामटेक येथील बहीण पपिता कडे मुलासह राहली,तर मागिल एक महिन्याआधी गादा गावात बहीन सरिता च्या आधाराने भाडयाने वास्तव्यास होती., दरम्यान काही दिवसाआधी पती राजेंद्र हा मृतक ला कामठी बस स्टॉप वर भेटला व समजूत घालून गावात पोलीस पाटीलीन समोर न्याय करायचं सांगून वाघोली येथे घेऊन गेला.ही बाब मृतकच्या बहीणीला कळताच न्याय गादा गावात होईल असे बजावुन गावात बोलावले,यावेळी गादा ग्रा प चे सरपंच व पोलिस पाटील समोर झालेल्या बैठकीत राजेंद्र ने सुधारण्यासाठी तीन ते चार महिण्याचा वेळ मागीतला व मृतक भाग्यश्री ला म्हटले होते की तुला माहीत आहे मी काय करू शकतो तू पाहून घेशील तुला मी काय करतो यावरून पोलीस स्टेशन ला तक्रार सुद्धा नोंदवली होती.तर काल 2 जुलै ला सकाळी साडे सहा वाजता मृतक भाग्यश्री ही सुपर सपेशालिटी नागपुर येथे कामाला गेली असता कामादरम्यान मुलीशी मोबाईल वर बोलली व सायंकाळी 6.30वाजता कामठित असल्याचे सांगितले आणि आठ वाजे दरम्यान चक्क मृतदेह चा आढळला.एकीकडे मृतक भाग्यश्री चा पहिला पती विनोद रंजक ने मृतक शि दूर झाल्यानंतर कधी संपर्कात च आला नाही तर दुसरा पती राजेंद्र हा संपर्कात असू न जीवे मारण्याच्या धमकी देत होता,।₹तेव्हा या खून प्रकरणातील मारेकरी कोण?याचा शोध घेणे पोलीसासाठी एक आव्हान ठरले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.