spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घोटमुंढरी जि प शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचे शाल, त्रिफळ व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार.

कोदामेंढी ०४ : दिनांक 30 जून रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले घोटमुंढरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेषराव आंबीलढुके यांचे सेवानिवृत्त सपत्नीक सत्कार समारंभ कार्यक्रम  एक  मंगळवार (दि. 1 जुलै) ला स्थानिक सार्वजनिक हनुमान मंदिरात घेण्यात आले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार समारंभात आलेल्या लोकप्रतिनिधी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, पुढारी, मान्यवर, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,सहकारी शिक्षक वृंद, मित्रपरिवार यांनी त्यांच्या शाल, त्रिफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल,माजी जि प  सदस्या राधा मुकेश अग्रवाल, सरपंच चंदा गेडाम, सिटी इंडिया न्यूज चॅनलचे नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय पांडे, परिसरातील शिक्षक वृंद पडोळे , एम एम लोणीया , विनोद हुमणे, विकास धारगावे, नरेश आचले, अमृते, नाटकर , कुकडे , मोहन घुगुसकर, संजय आंबीलढुके, सुखदेवे , दंडारे , वाघमारे , वानखेडे , मेश्राम , रामटेके , डोडरे , प्राध्यापिका पटले , ठाकरे, देवतारे, कुरसुंगे , रहाटे,  मेश्राम, सुरेखा सलामे , श्वेता खडगि, एलव्ही, प्रल्हाद चुटे , जिल्हा परिषद शाळा घोटमुंढरी मधील शिक्षकवृंद वासनिक , किरपान, महादुले , मनोज वंजारी ,  वंदना खेताडे , थुलकर , शिल्पा खंडाईत , सुधीर खंडाईत , सर्व ग्रामपंचायत सदस्य गण, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारमूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेषराव आंबिलढुके सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, माझ्या कार्यकाळात स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,सर्व सदस्य गण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , सर्व सदस्यगण, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शाळेला क्रीडा, सांस्कृतिक, बौद्धिक व इतरही क्षेत्रात जिल्ह्यात नावलौकिक करून दिले. सतत पाठपुरावा करून शाळेच्या सुसज्जित इमारती करिता दीड कोटी रुपये आणले व इतरही सर्व भौतिक सुविधा शाळेला प्राप्त करून दिले. पुढे मुख्याध्यापक म्हणून रुजू होणाऱ्या शिक्षकांनी शाळेची ही परंपरा कायम ठेवून या गावाचे नाव व या शाळेचे नावाचे  जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही  लौकिक करावे.

Popular Articles