spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिक्षक भरती घोटाळा! शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक रवींद्र सलामे अटकेत, ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी.

भंडारा/नागपूर ०४  – शिक्षक भरती घोटाळ्यातील कारवाईचा धडाका सुरूच असताना आता आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद भंडारा (सध्या नियुक्त – गडचिरोली) कार्यालयातील अधीक्षक रवींद्र पंजाबराव सलामे यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.सलामे यांच्यावर भादंवि कलम 420 , 465 , 468, 471, 472, 409, 120ब  आणि 34  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ६ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बनावट नियुक्ती आदेश, बनावट अनुभव प्रमाणपत्राचा कट
या प्रकरणात आरोपी पराग नानाजी पूडके (रा. लाखनी) याने कोणत्याही शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून प्रत्यक्ष नियुक्ती न झालेला असतानाही, नानाजी पूडके विद्यालय, जेवणाळा या शाळेतील मुख्याध्यापक पदासाठी खोट्या नियुक्ती आदेश, सेवा सातत्याचे बनावट दस्तऐवज, आणि एस. के. बी. शाळा, यादव नगर, नागपूर या शाळेच्या लेटरहेडवर बनावट अनुभव प्रमाणपत्र तयार करून शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर केले होते.
ही बनावट कागदपत्रे आरोपी महेंद्र म्हैसकर याच्या मदतीने तयार करून अधीक्षक सलामे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सलामे यांनी संबंधित कागदपत्रे बघूनही त्यातील बनावटपणा न पाहता त्यावर पुढील प्रक्रिया केली. यामुळे त्यांच्यावर सहभाग व कट रचण्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात आधीच काही आरोपींना अटक झाली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत घोटाळा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवण्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.