खापा, वार्ताहर :- सध्या इराण इजराइल अमेरिका यांचे युद्ध सुरू आहे. त्यातच जगभरात इंधनपुरवठ्यावर काहीसा परिणाम झाला आहे. याचाच परिणाम म्हणून आता नागरिकांना पर्याय म्हणून चुलीचा वापर करावा लागत आहे.
सावनेर तालुक्यातील खापा शहरालगत गुमगाव खान येथे मॉयलद्वारे ‘चायना कोल नंबर थ्री इंडिया प्रा. लि.’ या चायनीज कंपनीला खोदकाम दिले आहे. तिथे अंदाजे १०० चायनीज आणि ५० ते ६० भारतीय कामगार काम करतात. यांच्या जेवणाची व्यवस्था ही कंपनीद्वारे करण्यात येते. कामगारांसाठी स्वयंपाक करण्यासाठी व्यावसायिक सिलेंडर मिळेनासे झाले आहे. त्याचाच पर्याय म्हणून चायनीज वेल्डरने लोखंडी चूल तयार केली. आता त्या धुरविरहित चुलीवर कूक अनिकेत वल्के, अभिषेक वल्के, राज टेकाम, शुब्बू मरसकोल्हे हे स्वयंपाक करून या चायनीज व भारतीय कामगारांची भूक भागवत आहे.








