spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संत रविदास महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत” – शेखर चवरे 

– समता आणि एकतेचा संदेश देत संत रविदास महाराजांची ६४९ वी जयंती उत्साहात साजरी

यवतमाळ :- दारव्हा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये संत रविदास महाराजांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत पवार आणि नगराध्यक्ष सुनील चिरडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

यावेळी शहरप्रमुख राजू दुधे, नगर परिषदेचे गटनेते कृष्णा शेलोकर, प्रकाश दुधे, सचिन जाधव, एकनाथ माहुरकर, संतोष एडमे, दीपा सिंगी, पल्लवी वाकोडे, विशाखा बिहाडे, कविता शिले, सिमा चव्हाण, धनंजय बलखंडे, रोनित गुल्हाने यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य प्रशांत मेश्राम यांनी संत रविदास महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. यावेळी एसबीआय दारव्हा शाखा व्यवस्थापक शेखर चवरे यांनी संत रविदास महाराजांचे विचार समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच एमएसईबीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता योगेश तायडे यांनी समाजासाठी शासकीय योजना, शिक्षण, संघटन आणि मानवतेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊराव सूरस्कार होते, तर मधुकर तांडेकर आणि बाबारावजी सोरे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गोपाल हिरवे सर यांनी केले, तर शिरीष मराठे सर यांनी आभार प्रदर्शन केले.

नगराध्यक्ष सुनील चिरडे यांनी संत रविदास महाराजांनी दिलेल्या समतेच्या आणि एकतेच्या शिकवणीचे कौतुक करत समाजात एकजूट टिकवण्याचे आवाहन केले. तसेच आमदार संजयभाऊ राठोड यांच्या समाजकारणाविषयीच्या भावना उपस्थितांसमोर मांडल्या. पुढील जयंती अधिक व्यापक समाजभावनेत साजरी करण्याचा शब्द त्यांनी दिला.

यावेळी अॅड. संदीप पाटील यांच्या पुढाकाराने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातून आलेल्या लक्ष्मण सोरे, संतोष सूरस्कार (सरपंच), गजानन दायदार, निरंजन नाचणे, उमाकांत लहाडके, राजू दायदार आणि सुनील तांडेकर यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक व मान्यवरांचा नागरी सत्कार केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम इंगळे, राजेंद्र धामणे, अशोक पाचखंडे, वामन सूरस्कार, विशाल तांडेकर, नानू तांडेकर, सहादेव खंडारे, जगजीवन खंडारे, दिगंबर पाटील, शुभम तांडेकर, सूर्यप्रकाश दायदार, गजानन इंगळे, निलेश पाटील, गौरव इंगळे, शाम खडतरे, मारोतराव पाचखंडे, गुड्डू खडतरे, विवेक मनगटे, उमेश मनगटे, प्रकाश पुरस्कार, गोपाल पाटील तसेच दारव्हा चर्मकार समाजातील महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.