Home Latest News राज्यात रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्मची वेबसाइट बंद, नागरिक त्रस्त!

राज्यात रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्मची वेबसाइट बंद, नागरिक त्रस्त!

0
54

 

नागपूर २२: महाराष्ट्रातील रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्म विभागाची जुनी वेबसाइट २७ जुलैपासून बंद असून, नवी रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्म २.० ही वेबसाइट ०४ ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू होणार होती. परंतु, महाराष्ट्र टेक्निकल टीमने वेबसाइट अपडेट करण्यासाठी वेळवाढ देत हा कालावधी प्रथम १० ऑगस्टपर्यंत, त्यानंतर पुन्हा २० ऑगस्टपर्यंत वाढविला. मात्र, अद्यापही ही वेबसाइट सुरू न झाल्याने जवळपास एक महिन्यापासून रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्मच्या फायलींग आणि ऑब्जेक्शन फायलींगचे काम पूर्णपणे ठप्प आहे.

यामुळे भागीदारी फर्म नोंदणीसंबंधीचे सर्व कामकाज ठप्प झाले असून नागरिक, व्यापारी आणि उद्योगपती यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शासकीय विभागांमध्ये जसे की बँक, उत्पादन शुल्क (Excise), मिहान प्रकल्प  भागीदारी फर्मची नोंदणी प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य असते. मात्र, वेबसाइट बंद असल्यामुळे कामकाजात मोठी अडचण निर्माण झाली आहे.

सरकारी विभागातील कामकाज आधीच कासवाच्या गतीने चालते आणि त्यातच वेबसाइट बंद पडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या ठप्प अवस्थेमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर आणि उद्योगांवर मोठा परिणाम होत आहे.

याबाबत बोलताना अ‍ॅड. तिलकराज खुंगर यांनी सांगितले की,

नवीन साइट सुरू झाल्यानंतरच जुनी साइट बंद करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कलेक्टर, मुंबई रजिस्टर ऑफ फर्म कार्यालय, विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाने तातडीने योग्य ती कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा.