spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापारेक्षणच्या २२० के.व्ही. उपकेंद्र कन्हान येथे चोरी

कन्हान :- तारसा रोड कन्हान येथिल महापारेषणच्या २२० के.व्ही. उपकेंद्रात अज्ञात चोरट्यांनी चेनलिंक फेन्सिंग कापुन प्रवेश करत सुमारे १६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गुरूवार (दि.३०) जुलै च्या रात्री म्हणजे शुक्रवार (दि.३१) जुलै च्या मध्यरात्री १२.३० ते पहाटे २ वाज ता दरम्यान महापारेक्षण अंतर्गत २२० के. व्ही. उपकेंद्र तारसा रोड कन्हान येथे अज्ञात चोर यार्ड मधिल चेनलिं क फेन्सिंग कापुन आत मध्ये प्रवेश करून २२० के.व्ही सूर्यालक्ष्मी बे चे लाईन्स आयसोलेटर चे अर्थ स्विच रॉड ०२ नग, आर व वाय फेज चे चोरून नेले. चोरी झाले ल्या साहीत्याची किंमत १६००० रुपये एवढी आहे. (दि.३०) जुलै २०२६ ला रात्री पाळी मध्ये सुरक्षा रक्षक दिनेश चिमोटे व विलास कुर्वे हे कार्यरत होते. सुरक्षा रक्षक यार्ड मध्ये गस्त घालतांना त्यांना यार्ड च्या एका भागाचे लाईट बंद असलेले दिसल्याने सूचना त्यांनी २२० केव्ही कन्हान उपकेंद्र कंट्रोल रूम ला दिली, कंट्रो ल रूम मध्ये रोहीत मुगले उप. कार्यकारी अभियता, संतोष राठोड उप मु. तंत्रज्ञ, व धर्मेंद्र गडपायले तंत्रज्ञ हे कार्यरत होते. सूचना मिळाल्या बरोबर सुरक्षा रक्षक यांना त्या भागाची पाहणी करण्यास निर्देश दिले. व नंतर सी.सी.टी.व्ही ची पाहणी करतांना अंदाजे १.२० वाजता रात्री ला अज्ञात व्यक्ति २२० के. व्ही स्विचयाड मध्ये आढळले. तेव्हाच माहिती सुरक्षा रक्षकांना दिली आणि कार्यरत पाळी प्रमुख निसग मुंगले व धर्मेंद्र गडपायले हे दोघेही यार्ड कडे घटना स्थळावर गेले अस ता अज्ञात व्यक्ति खाली वाकुन कापलेल्या चेनलिंक फॅन्सिंग च्या दिशेने पळतांना दिसला. ही बाब लगेच त्यांनी उपकेंद्र प्रमुख धम्मरत्न मेश्राम अति. कार्य. अर्भियता यांना मोबाईल द्वारे कळविले तसेच पोलीस स्टेशन कंट्रोल रूम क्र. ११२ वर सदर घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस स्टेशन कन्हान येथील बिट मार्शल प्रणित दहीवले हे घटनास्थळाचे निरीक्षण करून गेले.

वरील चोरीची बाब खूप गांभीर्याची असल्याने उपकेंद्र प्रमुख धम्मरत्न मेश्राम अति. कार्य. अर्भियता याच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस निरिक्षक वैजयंती मंडवधरे याच्या मार्गदर्शनात कन्हान पो. स्टे. ला चोरी चा गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आरोपीचा शोध घेत आहे.

Popular Articles