spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महावितरणच्या दुरुस्ती कामांमुळे आज काही भागात वीज नाही

 नागपूर, दि. ३० : महावितरणतर्फे करण्यात येणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांमुळे बुधवारी (दि. 30 जून) नागपुरातील कॉग्रेसनगर आणि गांधीबाग विभागांमधील काही परिसरांमध्ये वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. आपल्या सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठ्यासाठी ही कामे आवश्यक असल्याने, ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

या कामांमुळे कॉग्रेसनगर विभागात सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत गोकुळपेठचा काही भाग, गिरिपेठ, धरमपेठ, पोलीस वसाहत, ट्रॅफिक पार्क, वनामती, सुजाता लेआउट, लोकसेवा सोसायटी, दिनदयाल नगर, धरमपेठ लेआउट, सुभाष नगर, शास्त्री लेआउट, तुकडोजी नगर, कामगार कॉलनी, विवेका हॉस्पिटल, नाईक लेआउट, हिंगणा रोड. सकाळी 8 ते 11 या वेळेत वर्मा लेआउट, मुंजेबाबा लेआउट, लंडन स्ट्रीट, जयप्रकाश नगर, वर्धा रोड, पांडे लेआउट.सकाळी 8.30 ते 11 या वेळेत आरपीटीएस रोड आणि लक्ष्मीनगरचा काही भाग. सकाळी 7.30 ते 9 या वेळेत इंजिनियर सोसायटी, बांते लेआउट. सकाळी 9.30 ते 11 या वेळेत नवनिर्माण, पडोळे रुग्णालय परिसर. सकाळी 8.30 ते 11.30 या वेळेत आनंद नगर, अमरशा लेआउट, फुलसुंगे लेआउट, जयताळा बाजार चौक, अष्टविनायक नगर, नागपूर विद्यापीठ सोसायटी, हिरणवार लेआउट, घरकुल सोसायटी, यशोदा नगर, रेणुका सोसायटी, साकेत धाम, मंगल धाम, टाकळी सिम, हिंगणा रोडचा काही भाग येथील वीज पुरवठा बंद राहील.

याशिवाय गांधीबाग विभागात सकाळी 8.30 ते 11 या वेळेत गांधीबाग, भवानी नगर, रेणुका नगर, पूनापूर रोड. तर सकाळी 9 ते 12 या वेळेत चिकली झोपडपट्टी, आभाळ घरकुल, मेहंदीबाग, कांजी हाऊस, कांजी चौक, जोशीपुरा, जयभोले नगर, विनोबा भावे नगर, राजीव गांधी नगर, संजयबाग कॉलनी, नागसेनवन, वनदेवी नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, नामदेव नगर, शाहू मोहल्ला, वृंदावन नगर, अणे नगर, जमादारवाडी, पाठराबे वाडी, बापू पाटील वाडी, सोनार टोळी या बागातील वीजपुरवठा बंद राहील.

ग्राहकांना होणाऱ्या त्रासासाठी महावितरणने दिलगीरी व्यक्त केली आहे आहे. तथापि, या दुरुस्तीमुळे अधिक चांगला आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळेल याची खात्री महावितरण देत आहे. आपल्या सोयीसाठी कृपया या वेळेत आवश्यक ती तयारी करून ठेवावी आणि सहकार्य करावे.

Popular Articles