spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात डबल बेड अन् किचन दुरुस्तीसाठी 40 लाखांहून अधिक खर्च; रोहित पवारांचा घणाघात

 

मुंबई १८  : ‘आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नसताना, राज्यावरील कर्जाचा बोझा 9.5 लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी double bed matress, सोफा यासाठी 20.47 लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी 19.53 लाख असा एकूण 40 लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलाय . x माध्यमावर पोस्ट करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फटकारलंय . सोबत त्यांनी या संदर्भातील ई – निविदाही जोडलीय .

राज्यभरात गेल्या दीड महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांची पिकं डोळ्यांदेखत आडवी झाली आहेत . अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सरकारवर दबाव वाढतोय .

काय म्हणाले रोहित पवार ?
आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नसताना, राज्यावरील कर्जाचा बोझा 9.5 लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी double bed matress, सोफा यासाठी 20.47 लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी 19.53 लाख असा एकूण 40 लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई?

मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असंच चालू राहिलं तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल… मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केंव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना..!

‘देवाभाऊ, शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही’
महाराष्ट्राच्या काळ्या आईशी इमान राखण्यासाठी आपण आलो आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. बीडसारख्या जिल्ह्यात अनेकवेळा दुष्काळ असतो तिथं अतिवृष्टी झाली आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. याचा परिणाम शेतीवर झाला. संकटातून मार्ग काढायचा असतो तो मार्ग काढण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्राची असते. शेतकरी आक्रोश करतो आहे मात्र आजचे राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला.

source : abpमाझा


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.