Home Latest News दोन तासांत मुद्देमालासह चोरटा ताब्यात

दोन तासांत मुद्देमालासह चोरटा ताब्यात

0

<p><strong>नाशिकरोड &colon;<&sol;strong> रेल्वे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत चोरीच्या मालासह चोरट्याचा अटक केली&period; ही कारवाई मध्यप्रदेशातील प्रवासी यश्वी राजेंद्र धरवा &lpar;24&rpar; यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली&period; हा प्रकार पंजाब मेलच्या नाशिकरोड ते चाळीसगाव प्रवासादरम्यान घडला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>धरवा यांच्या बॅगची चोरी झाली होती&period; या बॅगेत लॅपटॉप&comma; मोबाईल&comma; पॉवर बँक&comma; इअरफोन&comma; चॉकलेट&comma; परफ्यूम आणि 720 रुपये असा एकूण एक लाख तीन हजार 720 रुपयांचा ऐवज होता&period; त्यांनी अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचा&comma; निळसर टी-शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला युवक बॅग घेऊन जाताना पाहिला होता&period; त्यानुसार रेल्वे पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली&period; संशयित त्याच गाडीतील जनरल कोचमध्ये मिळून आला&period; त्याने आपले गायकवाड असे नाव सांगितले&period; तपासणीदरम्यान त्याच्याकडे चोरीस गेलेली बॅग आणि सर्व माल मिळून आला&period; फिर्यादीने व्हिडिओ कॉलवरून बॅगेची ओळख पटवली&period; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरीस गेलेला ऐवज सुरक्षितपणे परत मिळाला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे&period; सहायक पोलिस निरीक्षक सचिन बनकर&comma; पोलिस उपनिक्षक संजय केदारे&comma; सुभाष कुलकर्णी&comma; हवालदार उत्तम शिरसाठ&comma; अल्का तळोले तसेच रेल्वे सुरक्षा बलातील मनिषकुमार व भूषण पाटील यांनी ही कामगिरी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari<&sol;p>&NewLine;

Exit mobile version