– श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन शनिवार,३१ जानेवारीला
नागपूर :- डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे राजहंस प्रकाशन प्रकाशित, ‘त्यानंतर’, पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘सर्ग’ हे दोन कविता संग्रह आणि दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित’ समीक्षेची संस्कृती आणि संस्कृतीची समीक्षा ‘हा समीक्षा विषयक ग्रंथ या तीन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ शनिवार, ३१ जानेवारी, रोजी सायंकाळी ५.४५ वाजता. नागपूर येथील पंचशील चौकातील टिळक पत्रकार भवनात पत्रकार परिषदेच्या दालनात मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रख्यात ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ वि.स.जोग यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. डाॅ. शैलेंद्र लेंडे, मराठी विभाग प्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डाॅ. कोमल ठाकरे, अधिष्ठाता, मराठी विद्यापीठ, रिद्धपूर हे संबंधित पुस्तकांवर भाष्य करतील. सूत्रसंचालन शुभदा फडणवीस करतील. याप्रसंगी साहित्य प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे. अशी विनंती, सुनील पाटील कार्यवाह, विदर्भ सांस्कृतिक परिषद, अनिल कुलकर्णी संस्थापक संचालक, विश्व मराठी परिषद व, अभिषेक जाखडे, पद्मगंधा प्रकाशन आणि मधुर व मोहित बर्वे संचालक, दिलीपराज प्रकाशन ह्यांनी केली आहे.




