spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तीन दिवसीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन

यवतमाळ :- अनाथ, निराधार, निराश्रित तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरू बालमहोत्सव २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा बालमहोत्सव दि. १९ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत शासकीय मुलांचे बालगृह व निरीक्षणगृह तसेच पोलिस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात येणार आहे.

सदर बालमहोत्सवाचे उद्घाटन दि. १९ जानेवारी रोजी शासकीय मुलांचे बालगृह व निरीक्षणगृह, यवतमाळ येथे होणार असून, यावेळी जिल्हाधिकारी, यवतमाळ, विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, अमरावती विभाग, तसेच बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य आणि बाल न्याय मंडळ, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या तीन दिवसीय बालमहोत्सवात मैदानी स्पर्धा, इनडोर गेम, सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Popular Articles