spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पालकमंत्र्याच्या हस्ते उत्कृष्ट तीन मंडळ अधिकाऱ्यांचा सत्कार

Ø छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

यवतमाळ :- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या 10 एप्रिलच्या टप्प्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील तीन मंडळ अधिकाऱ्यांचा पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

प्राप्त गुणांनुसार मारेगाव तालुक्यातील जळका बो. मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. घाटंजी तालुक्यातील घोटी मंडळाने द्वितीय क्रमांक मिळविला असून यवतमाळ तालुक्यातील मोहा मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. या मंडळांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मंडळ अधिकारी रघुनाथ, मानिक गोहोकर आणि विनोद अक्कलवार यांचा पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी प्रशस्तीपत्र देवून सत्कार केला.

Popular Articles