– आदिवासी विकास मंत्री ना. डॉ अशोक उईके यांची उपस्थिती
यवतमाळ :- राळेगाव तालुक्यातील वडकी मंडळात आदिवासी विकास मंत्री ना. डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात संपन्न झाला.
या शिबिरात आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, वय व राष्ट्रीत्व प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर यांसारखी अनेक प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले. यासह शिधापत्रिका, आधार दुरुस्ती, ई मोजणी, अॅग्रीस्टॅक, सातबारा, आठ-अ, फेरफार, पीएम किसान, इतरही दाखले व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले.

याशिवाय शिबिरात विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना योजनांची माहिती दिली. तसेच परिसरातील युवकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.
या शिबिराला उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, मंडळ अधिकारी दिलीप चिडे आणि वडकी मंडळ परिसरातील नागरिक उपस्थित होते.








