spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना येथे थरारक घटना : अस्वलाच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

 

चंद्रपूर २६ : चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना येथील जंगलात २३ ऑगस्ट रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत अस्वलाच्या हल्ल्यात वडील अरुण कुकसे यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा विजय गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. अरुण कुकसे यांना तातडीने नागपूर येथील ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र २५ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी अरुण कुकसे आणि त्यांचा मुलगा विजय हे पाने तोडण्यासाठी जुनोना जंगलात गेले असता अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला. वडिलांना वाचवण्यासाठी विजयने अस्वलाशी झुंज दिली, मात्र अस्वलाने दोघांनाही पंज्यात पकडून गंभीर जखमी केले. त्यांच्या आरडाओरड ऐकून गावकरी जंगलात धावून आले व अस्वलावर हल्ला करून पिता-पुत्राची सुटका करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जखमी झालेल्या अस्वलाला वनविभागाने पकडले, परंतु लोकांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने २४ ऑगस्ट रोजी त्याचाही मृत्यू झाला. घटनेदरम्यान अरुण कुकसे यांच्या डोक्यावर अस्वलाने जोरदार प्रहार केला होता, ज्यामुळे त्यांचा मेंदूचा काही भाग व डोळे बाहेर आले होते, अशी प्रत्यक्षदर्शीची माहिती आहे. सध्या विजय कुकसे रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात पिता-पुत्रांना अस्वलाने पकडून ठेवलेले दिसत आहे, तर गावकरी त्यांना वाचवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर जुनोना गावकऱ्यांनी अरुण कुकसे यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि मुलगा विजयला वनविभागात नोकरी देण्याची मागणी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.