नागपूर :- टायगर सिटी सायकलिंग असोसिएशन, नागपूर यांनी रविवारी १६ नवम्बर रोज़ी भव्य रस्ता सुरक्षा सायकल रॅली आणि वॉकाथॉनचे यशस्वी आयोजन केले. हा कार्यक्रम दिवंगत सायकलस्वार अनंत कैडलवार, अतुल कडू आणि अँड. रमन नाकतोडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यातून सुरक्षित रस्त्यांसाठी समाजाची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली, ज्यात नीरी मॉडर्न स्कूलच्या प्राचार्या बीजी जॉर्ज, ज्येष्ठ सायकलस्वार डॉ. भूपेंद्र आर्या, नागपूरचे बायसिकल मेयर डॉ. अमित समर्थ तसेच एएनएस सील्सचे जितेंद्र नायक यांचा समावेश होता. मान्यवरांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि दिवंगत सायकलस्वारांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे संचालन राजेश मोहिते, टीसीसीएचे अध्यक्ष दिलीप वरकड़, प्रदीप देशपांडे, उदय पानवलकर यांनी संस्थेचे कार्य तसेच सायकलिंग करण्याचे फायदे विशद केले.
टायगर सिटी सायकलिंग असोसिएशनतर्फे नागपुरात भव्य रस्ता सुरक्षा सायकल रॅली आणि वॉकाथॉनचे आयोजन









