spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने घेतला पुन्हा एक बळी….

चिमूर :- काल सायंकाळी भिसी -शंकरपूर येथील वन विभाग परिक्षेत्रात असलेल्या आंबोली -आसोला गावालगत असलेल्या वन परिक्षेत्रातील शंकरपूर येथील ईश्वर भरडे या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. कार्यतत्पर व संवेदनशील असलेले ईश्वर भरडे त्यांच्यावर झालेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिक चांगलेच वन विभागावर भडकले. काही वेळासाठी तणावही निर्माण झाला होता.

समस्त घटनेची माहिती गावकऱ्यांना होतास परिसरातील नागरिकांचा जमाव एकत्र येऊन वन विभागावर चांगलाच रोष व्यक्त केला . चिमूर परिक्षेत्रातील हा तिसरा वाघाचा बळी असून काही दिवसापूर्वीस लावारी येथील एका महिलेचा वाघाने बळी घेतला होता. त्यानंतर शिवरा येथील माजी सरपंच असलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले. या परिसरात सध्या वाघाची चांगली दहशत निर्माण झाली असून परिसरातील नागरिक दहशतीत वावरत आहेत. वन विभागाकडून तात्पुरती कारवाई केली जाते. परंतु वाघांचा बंदोबस्तासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकात खंत व्यक्ती केली जात आहे.

काही दिवसापूर्वीच शेतात कामावर असलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला केला.परंतु तिने आरडाओरडा केली असता तिच्या जवळ असलेल्या तिच्या डेराने तत्परता दाखवत वाघाला हाकलले या घटनेपासून त्या महिलेला वाचवले. ही घटना ताजी असतानाच काल पुन्हा वाघाने एकाचा बळी घेतला.

तिसरा बळी… वाघाची दहशत

वाघाने शंकरपूर परिसरात दीड महिन्यात तिसरा बळी घेतला आहे. तिन्ही घटनांचे अंतर सुमारे २ किलोमीटर आहे. १८ सप्टेंबर रोजी लावारी येथील विद्या कैलास मसराम, २८ ऑक्टोबर रोजी नीलकंठ भुरे यांचा बळी घेतला. यानंतर नागरिकांनी नागभीड-कान्पा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. यानंतर पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.