spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हर्षोल्लासात संपन्न

 
तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे करिअर मार्गदर्शन व्याख्यान संपन्न
नागपुर ०८ : तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे सन 2024 – 25 शैक्षणिक वर्षातील उच्च गुणवत्तेने उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ६ जुलै रोजी, टाऊन हॉल बीडीपेठ आशीर्वाद नगर नागपूर येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्या समाजातील 60 पेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला गुणवंत विद्यार्थ्यांना व्यतिरिक्त गजानन विद्यालय नवीन सुभेदार, राई पब्लिक स्कूल जयताळा, आयडियल कोचिंग इन्स्टिट्यूट विद्यार्थी मोठ्या संख्येने समुपदेशन ऐकण्यासाठी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी जेष्ठ समुपदेशक व अभियंते आशिष तायवाडे यांचे करिअर मार्गदर्शनावर व्याख्यान झाले. तसेच तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुधाकरराव देशमुख तर प्रमुख पाहुणे माजी आमदार सुधाकर कोहळे तथा जिल्हा भाजप अध्यक्ष. मंडळाचे अध्यक्ष  पांडुरंग वाकडे पाटील, जेष्ठ काँग्रेस नेते गिरीश पांडव, तिरळे कुणबी समाज अध्यक्ष सुरेश कोंगे व समाजातील मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे संस्थापक ज्येष्ठ सभासद व सध्याचे कोषाध्यक्ष महादेवराव बोराडे यांच्या ८० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. समाज बांधवांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग वाकडे पाटील यांनी प्रस्ताविका संस्थेची सद्यस्थिती व सभागृहाच्या कामाच्या प्रगती बाबत माहिती दिली. अध्यक्ष देशमुख यांनी समाज बांधवांना एकत्रित होऊन समाज हितार्थ गोष्टींसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. त्यावेळी यांनी विविध क्षेत्रातील संधी बाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. मंडळाचे मार्गदर्शक सुधाकर कोहळे यांनी सभागृह वाटपाबाबत वस्तुस्थिती विशद केली. 500 कोटी निधीची सभागृहाची सुविधा कामे सुरू असून उर्वरित कामांसाठी पुन्हा शासनाकडून निधी आणून असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सौ.कीर्ती काळमेघ वनकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर मधुभाऊ घाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक कापसे, रवीप्रकाश ढोक, बबनराव गांजरे, नरेशचंद्र वसु, नितीन हांडे, युवराज गुडधे, पूजाताई मानमोडे, वैशालीताई काळे, विमल वाघमारे, रविंद्र महल्ले, अनिता वाकडे, विजय शहाणे यांनी अथक परिश्रम घेतलेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.