तिरोडा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय गोंदिया व तिरोडा तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने तिरोडा तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा चे आयोजन तालुका क्रीडा संकुल,तिरोडा येथे दिनांक 10 ,11 व 12 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद व खसाबा जाधव यांच्या छायाचित्राला मल्हारपण व पूजन करून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली व तिरोडा तालुक्याच्या स्पर्धेत वयोगट १४,१७,१९ मध्ये मुले व मुली तिरोडा तालुक्यातील 37 शाळेनी सहभाग घेतला व यात 512 विद्यार्थ्यांचा समावेश होता .या स्पर्धेला पंच म्हणून. प्रितेश भांडारकर,चंद्रप्रकाश प्रजापती,.श्रीकांत लांजावार, आकाश शहारे, मुकेश हजारे, अशोक गौतम, एम.चौधरी, एस.हरिणखेडे, ए.राठोड, एस.टेंभरे, अतुल बिनझाडे यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे निवड गोंदिया येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धे करिता करण्यात आले.
या स्पर्धेत प्रामुख्याने उपस्थित ओमकांता रंगारी तालुका क्रीडा अधिकारी तिरोडा, अमन नंदेश्वर तालुका क्रीडा संयोजक तिरोडा, क्रीडाशिक्षक शैलेश बघेले, नागोसे.राजेश तुरकर ,उमेश ढवळे,सूर्यवंशी संजय कटरे, दुर्गा नागदेवे, ओजस्वी लांजेवार,इतर शिक्षकवृंद यांनी स्पर्धेला विजयी झालेल्या खेळाडूना शुभेच्छा दिल्या.




