spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

टाकळी येथे पारंपरिक बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न

हंसराज, भंडारा :- टाकळी येथे शेतकरी आणि त्याच्या वर्षभर शेतात राबणाऱ्या कष्टकरी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पारंपरिक बैलपोळा सण टाकळी (भंडारा) येथे अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवात परिसरातील शेतकरी बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

भारतीय संस्कृतीत बैलपोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर शेतात अहोरात्र कष्ट करून घरादाराला सुगीचे दिवस दाखवणाऱ्या आपल्या लाडक्या ‘सर्जा-राजा’च्या उपकारांची परतफेड आणि सन्मान करण्याचा हा दिवस मानला जातो. या निमित्ताने टाकळी येथे बैलांची आकर्षक सजावट करून त्यांची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात आली व त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

भव्य आयोजनातून परंपरेची जपणूक:

या पारंपरिक बैलपोळा कार्यक्रमाचे आयोजन परिसरातील ग्रामस्थ तसेच नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा चंद्रकलाताई भोपे व पप्पू भोपे यांच्या वतीने करण्यात आले होते. ग्रामीण संस्कृती, शेतकऱ्यांचा सन्मान आणि परंपरा अखंड तेवत राहावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाने , नगरपरिषदेच्या माजी उपाध्यक्षा रुबी चड्ढा, नगरसेवक शिवजी आजबले यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच शैलेश खरोले, शैलेश मेश्राम, अतुल लोणारे, शिवा देशकर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांची धून आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद यामुळे संपूर्ण टाकळी परिसरात उत्साहाचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.