spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक उघड; आरोपी अटक

केळवद :- केळवद पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारद्वारे माहिती मिळाली की, खाजगी बसने अवैधरित्या प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची वाहतुक होत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी पोलीस स्टेशन केळवद हद्दीतील जुना केळवद बस स्टॉप येथे नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान खाजगी बस हे वाहन मिळुन आले, नमुद वाहनाच्या डिक्कीतील बॅग ची तपासणी केली असता दोन बॅग मध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधीत तंबाखु मिळुन आला. नमुद बॅग बाबत विचारपुस केली असता एका महीलेने सांगितले की, तिचे पती आरोपी नामे मनोज शंकरराव जोशी, वय ५५ वर्ष, ह.मु. वार्ड नं. १५, सौंसर, जि. पांढुर्णा, मध्यप्रदेश, स्थायी पत्ता. रा. शांतीनगर, मारवाडी वाडा, जैन मंदिर समोर, नागपुर, जि. नागपुर यांनी या बॅग ठेवल्या आहे. नमुद आरोपीला ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली त्यानेच नागपुर येथे नेवुन विकी करण्यासाठी अवैधरित्या खाजगी बस मध्ये प्रतिबंधीत सुगंधी तंबाखु ठेवला असल्याची माहीती प्राप्त झाली.

Popular Articles