यवतमाळ :- महिला व बाल विकास विभागांतर्गत महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, यवतमाळ आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प, दिग्रस यांच्या सहकार्याने, गाव बाल संरक्षण समिती सदस्य, सचिव आणि अंगणवाडी सेविका यांचे “बालकांचे कायदे विषयक प्रशिक्षण १८ सप्टेंबर २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, गुरुदेव नगर, दिग्रस येथे पार पडले.
प्रशिक्षण कार्यक्रम विशाल जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हे होते. यावेळी अमोल गुंडे, सहा. पोलीस उपनिरीक्षक सोनाली कनाके बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी धवणे पर्यवेक्षिका, श्याम गोमासे, संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणचे प्रास्ताविक देवेंद्र राजूरकर यांनी केले व प्रशिक्षण आयोजनाचा उद्देश सांगितला, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमन २०१५, बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार बाल संरक्षणात अंगणवाडी सेविका व गाव बाल संरक्षण समितीची भूमिका यावर उपस्थित मान्यवर यांनी व माधुरी पावडे-संरक्षण अधिकारी पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले व बाल विवाह विषयी माहितीपट दाखविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पोषण माह बाबत प्रतिज्ञा घेण्यात व पोषण माह राबविणे बाबत उपक्रमाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कोमल नंदपटेल यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेकरीता हेमंत शिंदे, राजकुमार डवरे यांचे विशेष सहकार्य लाभले.




