हरित महाराष्ट्र ,समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत राजोली येथे आज विविध ठिकाणी वृक्षारोपण

0
74
किशोर साहू मौदा, १६ :  मंगळवार (दि.15 जुलै) ला तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय राजोली येथे  सकाळी 11.00 वाजता हरित महाराष्ट्र ,समृद्ध महाराष्ट्र, एकाच दिवशी 15 जुलैला 10 कोटी वृक्ष लागवड व एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत सरपंच  योगेश महादुले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सर्व सदस्य, तसेच तंटामुक्त समिती, शाळा व्यवस्थापन समिती,महिला बचत गट यांच्या एकत्रित सहभागाने ग्रामपंचायत परिसर,शाळा परिसर तसेच स्मशानभूमी परिसरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.
 याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य  काशिनाथ पोटभरे, अर्चना वानखेडे, मीना तांडेकर  ग्रामपंचायत अधिकारी अंकिता चकोले, तलाठी चुटे, बचत गट सीआरपी व इतर सदस्यां तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.