यवतमाळ :- दुष्काळी परिस्थितीत आदिवासी बांधवांचा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी कळंब तालुक्यातील गणेशवाडी येथील कोलाम पोडाला भेट देत आदिम आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. शनिवारी (दि. ७) झालेल्या या भेटीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे क्षण अनुभवले.
दिवाळीचा सणानिमित्त आदिवासी बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होत मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे क्षण अनुभवले.
आदिवासी विकास मंत्र्यांच्या या भेटीमुळे कोलाम बांधवांमध्ये दिवाळीचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी गणेशवाडीचे सरपंच दिलीप मलांडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.






