किशोर साहू,मौदा :- अरोली – कोदामेंढी जि प सर्कल अंतर्गत येत असलेल्या नांदगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडई उत्सव समितीतर्फे दोन दिवसीय मंडई निमित्य सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उद्या मंगळवार (ता.१० नोव्हेंबर)ला सायं रेकॉर्डिंग डान्स, बुधवार (ता.११ नोव्हेंबर)ला सकाळपासून सायंकाळपर्यंत दिवसभर तमाशा तर सायं पुन्हा रेकॉर्डिंग डान्स चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख सह गावातील ,परिसरातील, तालुक्यातील ,राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे, अशी माहिती भ्रमणध्वनी वरून ग्रामपंचायत नांदगाव सरपंच दीपक पडोळे यांनी सोमवार (ता. ९ नोव्हेंबर)ला सायं दरम्यान दिली.
Latest News
Related Posts
नांदगाव येथे मंडई उत्सवाला आजपासून सुरुवात





