spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जंगलातील (रान मेवा) मशरूमसाठी आदिवासीयांची भटकंती

जंगली (रान मेवा) मशरुमला शहरात मागणी ५०० रुपये ते ८०० किलो प्रमाणे बाजारात विक्री

सचिन चौरसिया, रामटेक २५ :- आदिवासी भागातील जंगली मशरुमला रामटेक किंवा नागपुरात मोठी मागणी आहे सदर ‘भागातील नागरीक हे मोठ्या मेहनतीने जंगतालुन हे मशरूम काढुन गावाकडे किंमत मिळत नसल्याने शहराकडे नेवुन विकतात. पावसाळा सुरू झाला की गावठी मशरूम विक्रिसाठी आढळतात. जाडसर पानांमध्ये, माती लागलेल्या स्वरूपातच हे अळिंबीचे ( मशरूम) कळे ठेवलेले असतात. आदिवासी लोक पावसाळ्यात वाट्यावर विकायला आणतात पण कमी प्रमाणात. १२-१५ अळिंबी चा एक वाटा(जुडी) सहज ८०/- ते १००/- रूपयांमधे असतो. बऱ्यापैकी महाग असते पण तेवढेच पौष्टिक देखील आहे. फुललेल्या पेक्षा कळी स्वरूपात असलेले अळिंबी जास्त चांगले. मुक्या अळिंबी. अनेकांच्या शेतामधे बांधावर, वानवडीत रस्त्यांच्या लगतच्या झाडीमधल्या चढीवर किंवा एखाद्या झाडाच्या थोड्याशा ओलसर खोडाच्या बुंध्याशी उगवतात ही. पण विषारी आणि बिनविषारी अशी ओळखता आली पाहिजे. आदिवासींना नैसर्गिक वनस्पती आणि औषधी गुणधर्माची योग्य माहिती असतेच. पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणाऱ्या ह्या अळिंबीची एकदातरी अशी भाजी करून खाल्ली जाते. पावसाळ्याच्या आषाढ महिण्यात या रानमेवा हंगाम असतो, या हंगामातच हे रानमेवा निघतात रानमेवा हे डुंबरावर निघत असल्याने याला या भागात डुंबरभेंडी, तर आदिवासी भागात याला भोमोळी, टेकोळी, अळंबी असे म्हणतात. आदिवासी भागातील नागरीकांना या भागात रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना उपजिवीका करण्यासाठी जंगली मशरूम पण हा हंगाम मोठा नसुन सर्वांना काम मिळत नाही.

मशरुम (टेकोडी) आरोग्यासाठी फायदेशीर

मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मशरूममध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात. सोबतच त्याच्यात अनेक पोषणतत्व असतात. मशरुम करी, सलाड, सूप आणि भाजी बनवूनही खाता येतं. इतकंच नाही, तर मशरूम स्नॅक्स म्हणूनही खाता येतात. विशेष म्हणजे मशरूम अनेक आजारांवर एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीये. कर्करोगाशी निगडीत गुणधर्मानी परिपूर्ण आहे. प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो. असे जानकार व्यक्ती सांगतात.

Popular Articles