spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्व.लक्ष्मीबाई वाघाये पाटील यांना आरोग्य शिबिराद्वारे अभिवादन; लाखनी महाविद्यालयात भव्य आयोजन

हंसराज,प्रतिनिधी भंडारा लाखनी :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथे स्व.लक्ष्मीबाई निर्धनजी वाघाये पाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन प्रभारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी खडे आणि आरोग्यसेविका सोनवणे सिस्टर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. लक्ष्मीबाई वाघाये पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी डॉ. अश्विनी खडे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. बदलत्या जीवनशैलीत तरुणांनी आपल्या आहाराकडे आणि व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुचवले. सोनवणे सिस्टर यांनीही आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. एस. एस. शेंडे, प्रा. सपाटे, प्रा. सिंगनजुळे, प्रा. रांगडाले, प्रा. कागदे, प्रा. डोंगरवार, डॉ. भोयर, प्रा. हलमारे, प्रा. कुकडे, डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles