spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

– शहिद प्रकाश देशमुख अमर रहे …. अमर रहे …. अमर रहे . . . . 

कन्हान :- शहरातील वीर सुपुत्र शहिद प्रकाश देशमुख यांचा स्मृति प्रित्यर्थ माजी सैनिक आणि शैकडो नागरिकांनी तारसा रोड शहिद चौक येथे शहिद स्मारकावर पुष्पचक्र अर्पित करून श्रद्धांजली देण्यात आली.

कन्हान शहरातील सुपुत्र शहिद प्रकाश देशमुख यांचा जन्म २४ मार्च १९७८ मध्ये झाला असुन त्यांनी आपल्या कर्तव्यातुन १९९६ मध्ये भारतीय सेनेत शिपाई पदावर भर्ती झाले होते. ११ फेब्रुवारी १९९९ रोजी देशाचे रक्षण करतांना दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जम्मु मध्ये शहीद झाले. लहान वयातच सैन्यात सेवा केली. या घटनेला २७ वर्ष पूर्ण झाल्याने तारसा रोड शहिद चौक येथे दरवर्षी प्रमाणे श्रद्धांजली कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात शहिद प्रकाश देशमुख यांचे भाऊ प्रदीप देशमुख, आई लीलाबाई देशमुख, कामठी एनसीसी ओटीए सुभेदार नितीन वाघ, राहुल खैरनार, पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, माजी नगराध्यक्षा करुणा आष्टणकर आदि मान्यवरांचा हस्ते देशमुख यांचा निवासस्थानी प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहिद प्रकाश देशमुख यांचा स्मारकावर सैनिकांचा हस्ते पुष्पचक्र अर्पित करून सलामी दिली आणि राष्ट्रगीत गायन करून दोन मिनटाचा मौन पाळुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी कन्हान नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक घोडके, सुनिता मानकर, माजी सैनिक गौतम इवनाते, विशाल देऊळकर, मधुकर बोरकर, आशिष सोनी, जयचंद विश्वकर्मा, लाला चव्हान, नौशाद सिद्धिकी, नितीन महाजन, महेंद्र भगवे, शरद डोणेकर, ऋषभ बावनकर , प्रशांत मसार, बब्रुवान घोडमारे, वैष्णव डोणेकर, सुर्यभान चकोले, अमोल देऊळकर सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles