spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तिरोडा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

तिरोडा :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री रविकांत बोपचे यांच्या तिरोडा येथील स्थानिक जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, राजकीय व जनहितकारी कार्याचा आढावा घेतला. त्यांनी जनतेसाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. श्रद्धांजली कार्यक्रम शांत व शोकाकुल वातावरणात पार पडला.

यावेळी जिल्हा महासचिव नासिर घाणीवाला, संजय धुर्वे, विजय बुद्धे, जॉनी सैय्यद, चरणदास भाजीपाले, डी एन बोरकर, सुकाजी चौधरी, डीलेश बिसेन, राजेश ठाकूर, संकेत शामकुल, राहुल हेडाऊ आदींसह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Popular Articles