spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

– सावित्रीबाईंचे विचार आचरणात आणेल , तेव्हाच समाज प्रगतीपथावर जाईल – मंगेश यादव 

कामठी :- कामठी शहरातील भारतीय जनता पक्ष कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

भारतीय जनता पक्ष चे शहर अध्यक्ष मंगेश यादव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

स्त्रियांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य आणि विचार स्वतःच्या आयुष्यात अमलात आणले पाहिजेत , तरच त्यांचे जीवनमान खऱ्या अर्थाने उंचावेल, असे परखड मत मंगेश यादव यांनी व्यक्त केले.

स्त्रियांनी आपले आत्मपरीक्षण करून सावित्रीबाईंनी सोसलेले कष्ट आणि त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या वारशाचा सन्मान केला पाहिजे . जेव्हा स्त्री सावित्रीबाईंचे विचार आचरणात आणेल , तेव्हाच समाज प्रगतीपथावर जाईल , आजच्या काळात बाह्य रूपाला महत्त्व देण्यापेक्षा बुद्धी आणि कर्तृत्वाला महत्त्व द्या . सावित्रीबाईंनी शिक्षणाची दारे उघडली , त्याचा उपयोग स्वतःच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करा. असा मोलाचे मार्गदर्शन नगरसेवीका दिव्या गायधने यांनी दिले .

या प्रसंगी नागरेविका मनिषा नागपुरे ,अंतरा वैद्य, योगेश गायधने ,महिला आघाडी अध्यक्षा नंदा बराई, अश्विनी संतापे ,कार्याध्यक्ष राज हाडोंती, महामंत्री नरेश कलसे, प्रसिद्धी प्रमुख नितीन रावेकर, प्रीतम यादव , धीरज सोलंकी,अजय श्रीवास, अभिलाष यादव, आबीत अख्तर, यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.