spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रभाग 6 आदर्श प्रभाग बनण्याच्या मार्गावर – नगराध्यक्ष अजय अग्रवाल

– प्रभाग क्र 6 येथे नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या हस्ते स्वच्छता रथ चे लोकार्पण

कामठी :- सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्रभागातील मतदाराने केलेल्या मतदानातून निवडून आलेले नगरसेवक/नगरसेविका हे त्या प्रभागाचे जणू काही मुख्यमंत्रीच असतात ते आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न ,समस्या आणि विकासाच्या गरजा नगर परिषद प्रशासनापर्यंत पोहोचवून प्रभागातील विकासकामे, स्वच्छता व आरोग्य विषयक कामे करीत प्रभागातील रस्ते,पिण्याचे पाणी ,सांडपाण्याची व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या पायाभूत सुविधा पुरविण्याचे मुख्य कार्य करीत असतात त्यानुसार प्रभाग क्र 6 च्या नगरसेविका दिव्या कपिल गायधने ह्या प्रभागात विकासकामे करताना कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता प्रभागातील सर्वच भागात समान पातळीवर कामे करून सर्वांचा विश्वास संपादन करून अतिशय कर्तव्यदक्षपणे नगरसेविकाची भूमिका साकारत असून सुरुवातीपासूनच प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत प्रभागातील अस्वच्छता दूर करून ‘स्वच्छ प्रभाग स्वस्थ प्रभाग’बनविण्यावर भर देत आहेत याच कार्यप्रणालीतून नगरसेविका दिव्या कपिल गायधने यांच्या नेतृत्वात प्रभाग क्र 6 हा एक आदर्श प्रभाग ठरेल व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मौलीक प्रतिपादन नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी आज 10 मार्च ला प्रभाग क्र 6 येथे ‘स्वछता रथ ‘चे लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रेरणाने व कामठी नगर परिषदचे नगरअध्यक्ष अजयजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्रमांक 6 च्या सेविका दिव्या कपिल गायधाने द्वारा स्वच्छ प्रभाग मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला या अभियानाच्या पाश्वरभूमीवर ई-रिक्शा वर आधारित “स्वच्छता रथ” चे लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी मत व्यक्त केले .

याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष मंगेश यादव, नगर सेवक लालसिंग यादव, नगर सेविका मनीषा नागपूरे, नगर सेवक दिलीप बांडेबूचे, महिला आघाड़ी अध्यक्षा नंदा बारई, चंद्रशेखर तुप्पत, राज हड़ौती, उज्ज्वल रायबोले, राजेश देशमुख, कुणाल सोलंकी, आशु अवस्थी, सुनील पमनानी, अंश खंडेलवाल, अजय श्रीवास, सुशील गुलानी, शानू ग्रावकर, कमलेश शर्मा, हर्ष जोपत, गायत्री यादव, रोशनी कनफाड़े, यशवंत निखारे, अभिलाष यादव, बबलू रोचलानी, श्याम वर्मा, संतोष गुप्ता, शेखर इवनाती, चेतन अग्रवाल, अथर्व पिंगले, कृष्णा खंडेलवाल, धीरज सोलंकी, निलेश रावेक, सनी चौहान, राज शर्मा सहित अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.