Home Latest News त्र्यंबकेश्वर प्रकरण : पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी, पत्रकार संघाची मागणी

त्र्यंबकेश्वर प्रकरण : पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी, पत्रकार संघाची मागणी

0
62

तिरोडा :- श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बातमी संकलनाकरिता गेलेल्या पत्रकारांवर गावगुंडांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तिरोडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी विशेष निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

निवेदन तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांनी स्वीकारले. यावेळी पत्रकार बांधवांवरील वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबाबत कडक कारवाई करण्यात यावी तसेच पत्रकार संरक्षण कायदा कठोरपणे लागू करण्याची मागणी करण्यात आली.

या प्रसंगी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन आगाशे, उपाध्यक्ष सचिन ढबाले, सहसचिव पोमेश रहांगडाले, मार्गदर्शक मुकेश अग्रवाल, लक्ष्मीनारायण दुबे, तसेच पत्रकार बांधव देवेंद्र तिवारी, मनोहर नंदनवार, संजय जगणे, संजीव केशरवाणी, मनीष नंदरधने प्रामुख्याने उपस्थित होते.