Home Latest News ट्रक चालकाने साथिदारांसह ४.३० लाखांची डाळ लंपास; पारडी पोलिसांकडून गुन्हा दाखल

ट्रक चालकाने साथिदारांसह ४.३० लाखांची डाळ लंपास; पारडी पोलिसांकडून गुन्हा दाखल

0
125

नागपूर ११ : पारडी परिसरात घडलेल्या घटनेत ट्रक चालकाने आपल्या दोन साथिदारांसह तब्बल ४ लाख ३० हजार रुपये किमतीची तूरडाळ लंपास केली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

पारडीतील रहिवासी विशाल दिलीप संचेती यांचा कापसी येथे निर्मल दाल मिल आहे. त्यांना उत्तर प्रदेशातून तूरडाळीची ऑर्डर मिळाली होती. यासाठी २२ ऑगस्ट रोजी चालक ज्ञानेश्वर सुभाष अवचार याच्या ताब्यात डाळ भरलेला ट्रक रवाना करण्यात आला.

मात्र ट्रक उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी मधल्या मार्गातच थांबवून डाळ विक्री करण्यात आली. या गैरव्यवहारात चालकासोबत त्याचे साथीदार साहिल उर्फ अफजल खान आणि लालबहादूर रामबच्चन सनैया सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

संचेती यांनी तक्रार दाखल करताच पारडी पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. सध्या आरोपी चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.