spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा हाणामारी; पुण्याचा कुख्यात गुन्हेगार प्रवीण महाजन हल्लेखोर

नागपूर ११ : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमधील हाणामारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एका दिवसानंतर पुन्हा एकदा कारागृहात हिंसक घटना घडली असून, यावेळी पुण्याचा कुख्यात गुन्हेगार प्रवीण महाजन यात सामील असल्याचे समोर आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी घडली. रोजच्याप्रमाणे कैदी नळावर बादलीत पाणी भरत असताना यशपाल चव्हाण आणि ताजबादचा गुन्हेगार तौसीफ इब्राहिम यांच्यात बादली ठेवण्यावरून वाद झाला. हा वाद वाढत असतानाच प्रवीण श्रीनिवास महाजन तिथे पोहोचला आणि त्याने तौसीफवर हल्ला केला. त्याने तौसीफला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली.

या घटनेमुळे कारागृह परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ कारागृह अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी धंतोली पोलिसांना माहिती दिली. कारागृह अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रवीण महाजन याच्या विरोधात धंतोली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात नागपूर कारागृहात कैद्यांमधील हाणामारीची ही दुसरी घटना आहे. प्रवीण महाजनचा गुन्हेगारी रेकॉर्ड मोठा आहे. मे २०२१ मध्ये त्याने पुण्यामध्ये एका पोलीस शिपायाची हत्या केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला येरवडा कारागृहातून नागपूर कारागृहात पाठवण्यात आले होते, पण येथेही तो वारंवार हिंसक घटनांमध्ये सामील होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.