spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुषार भारतीय यांचा भाजपामध्ये पुन्हा प्रवेश ; निलंबन रद्द

– भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

मुंबई :- अमरावतीचे भाजपाचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश केला. भारतीय यांचे निलंबन रद्द करण्यात आले असून त्याबाबतचे पत्र त्यांना मंगळवारी देण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. भारतीय यांनी अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद तसेच पालिकेचे सभागृह नेते म्हणूनही काम पाहिले आहे.

Popular Articles