Home Latest News दोन घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या; ६ तोळे सोन्यासह ३ गुन्ह्यांचा गोबरवाही पोलिसांकडून उलगडा!

दोन घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या; ६ तोळे सोन्यासह ३ गुन्ह्यांचा गोबरवाही पोलिसांकडून उलगडा!

0
43

हंसराज,भंडारा गोबरवाही :- तालुक्यातील घरफोडीच्या घटनांनी नागरिक चिंतेत असतानाच, गोबरवाही पोलिसांनी अत्यंत कौसल्याने तपासाची चक्रे फिरवून दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ६ तोळे सोने जप्त केले असून, गोबरवाही आणि सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले एकूण ३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे.

गोबरवाही पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा (अ.क्र. २७५/२६) तपास करत असताना, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी अभिषेक ऊर्फ चांडरी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आणि त्याच्या मोबाईलमधील फोटोंची पाहणी केली असता, तो विधान पटले नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून विधान पटले यालाही ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, २० मे २०२६ रोजी अभिषेकने चोरी केली होती. त्यानंतर त्याने विधान पटले याला सोबत घेऊन चोरीचा माल अर्ध्या किमतीत वाटून घेण्याचे ठरवले. २१ मे रोजी या दोघांनी मध्य प्रदेशातील बोनकंटा येथे जाऊन एका सोनाराकडे काही सोने गहाण ठेवले, तर उर्वरित ५ तोळे सोने विधान पटले याच्या घरी लपवून ठेवले होते. पोलिसांनी मध्य प्रदेश आणि आरोपीचे घर अशा दोन्ही ठिकाणांहून ६ तोळे सोने यशस्वीरीत्या हस्तगत केले आहे.

पकडण्यात आलेल्या आरोपींनी केवळ हाच गुन्ह्या केला नसून, जिल्ह्यातील इतर दोन घरफोड्यांचीही कबुली दिली आहे. यामध्ये गोबरवाही पोलीस स्टेशनमधील गुन्हा क्रमांक १८५/२६ आणि सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत एप्रिल २०२६ मध्ये झालेली एक घरफोडी, अशा तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (तुमसर) मयंक माधव, आणि पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोबरवाही पोलिसांच्या तपास पथकाने केली आहे.