Home Latest News दोन घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या; ६ तोळे सोन्यासह ३ गुन्ह्यांचा गोबरवाही पोलिसांकडून उलगडा!

दोन घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या; ६ तोळे सोन्यासह ३ गुन्ह्यांचा गोबरवाही पोलिसांकडून उलगडा!

0

<p><strong>हंसराज&comma;भंडारा गोबरवाही &colon;-<&sol;strong> तालुक्यातील घरफोडीच्या घटनांनी नागरिक चिंतेत असतानाच&comma; गोबरवाही पोलिसांनी अत्यंत कौसल्याने तपासाची चक्रे फिरवून दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत&period; या कारवाईत पोलिसांनी ६ तोळे सोने जप्त केले असून&comma; गोबरवाही आणि सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले एकूण ३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>गोबरवाही पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा &lpar;अ&period;क्र&period; २७५&sol;२६&rpar; तपास करत असताना&comma; पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली&period; या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी अभिषेक ऊर्फ चांडरी याला ताब्यात घेतले&period; त्याची कसून चौकशी केली असता आणि त्याच्या मोबाईलमधील फोटोंची पाहणी केली असता&comma; तो विधान पटले नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर आले&period; पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून विधान पटले यालाही ताब्यात घेतले&period;<&sol;p>&NewLine;<p>दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की&comma; २० मे २०२६ रोजी अभिषेकने चोरी केली होती&period; त्यानंतर त्याने विधान पटले याला सोबत घेऊन चोरीचा माल अर्ध्या किमतीत वाटून घेण्याचे ठरवले&period; २१ मे रोजी या दोघांनी मध्य प्रदेशातील बोनकंटा येथे जाऊन एका सोनाराकडे काही सोने गहाण ठेवले&comma; तर उर्वरित ५ तोळे सोने विधान पटले याच्या घरी लपवून ठेवले होते&period; पोलिसांनी मध्य प्रदेश आणि आरोपीचे घर अशा दोन्ही ठिकाणांहून ६ तोळे सोने यशस्वीरीत्या हस्तगत केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पकडण्यात आलेल्या आरोपींनी केवळ हाच गुन्ह्या केला नसून&comma; जिल्ह्यातील इतर दोन घरफोड्यांचीही कबुली दिली आहे&period; यामध्ये गोबरवाही पोलीस स्टेशनमधील गुन्हा क्रमांक १८५&sol;२६ आणि सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत एप्रिल २०२६ मध्ये झालेली एक घरफोडी&comma; अशा तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन&comma; अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे&comma; उपविभागीय पोलीस अधिकारी &lpar;तुमसर&rpar; मयंक माधव&comma; आणि पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोबरवाही पोलिसांच्या तपास पथकाने केली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version