spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आजनगांव येथे दोन दिवसीय मंडई उत्सवाला आजपासून सुरुवात 

किशोर साहू, मौदा :- तारसा – धामणगांव जि प क्षेत्रातील गट ग्रामपंचायत आजनगांव (इसापूर )अंतर्गत येत असलेल्या आजनगांव येथे मागील १३ वर्षांपूर्वीप्रमाणे यंदा १४ व्या वर्षीही पशु गोवर्धनाच्या दिवसापासून पशुगोवर्धन गिरीधारी मंडळ आजनगांव तर्फे उद्या मंगळवार (ता.१० नोव्हेंबर) पासून दोन दिवसीय मंडई उत्सवाला सुरुवात होत आहे.

मंगळवार (ता.१० नोव्हेंबर)ला सायं.८ वाजता मौदा तालुक्यातील आदासा येथील शाहीर नीलकंठ लेंडे यांच्या संपूर्ण पार्टी सहित नवयुवक शुभान दंडार पार्टी यांच्या दंडारीच्या कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर तर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जि प सदस्य देवेंद्र गोडबोले राहणार आहेत.

बुधवार (ता.११ नोव्हेंबर)ला सकाळी १० वाजता कामठी तालुक्यातील आडका (माजरी) येथील शाहीर मारोती मारबते यांच्या विरुद्ध चिमूर तालुक्यातील नवेगाव येथील शाहीरा जया बोरकर यांच्या राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशा तर सायं ८ वाजता राष्ट्रीय कथासार गोंधळ पार्टी (परसोडी राजा) शाहीर कवडू उद्धव यांच्या संपूर्ण पार्टी सहित गोंधळ चे आयोजन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यमंत्री आशिष जयस्वाल तर उद्घाटक खासदार श्याम कुमार बर्वे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पशु गोवर्धन गिरधारी मंडळ पंच कमिटी अंजनगाव चे अध्यक्ष चिंधू रोटके ,उपाध्यक्ष धनराज पोटफोडे, ज्ञानेश्वर कडव, कोषाध्यक्ष सुरेश कहालकर ,सहकोषाध्यक्ष मनोहर कडव, सचिव वासुदेव वैद्य, सहसचिव गोपाल पोटफोडे, सदस्य गण सर्वश्री मोहन ढोणे, बंडू पोटफोडे, सुरेश पोटफोडे, ज्ञानदेव ढोबळे, दामू कडू, शेषराव कातुरे, बाळू जगनाडे, जितेंद्र सपाटे, सुनील जगनाडे, अशोक ठाकरे, देविदास पोटफोडे ,गजानन कडव ,मयूर शामदेव कुकडे परिश्रम घेत असून समस्त ग्रामवासी सहकार्य करत आहेत.

Popular Articles