Home Latest News दोघे खेळायला गेले, एक पाण्यात बुडाली, दुसरा घरी गेला

दोघे खेळायला गेले, एक पाण्यात बुडाली, दुसरा घरी गेला

0
104

– काळ आला अन्‌‍ खेळता खेळता जीव गेला

– कामठीच्या येरखेडा परिसरातील दुर्देवी घटना

– सहा वर्षांच्या मुलीसोबत नियतिचा क्रूर खेळ

नागपूर :- सकाळपासूनच दोघेही खेळत होते. ती शाळेतही गेली नाही, नाल्याजवळ मातीचे गोळे बनवित होती. खेळता खेळता चिमुकलीचा पाय पाण्यात पडला आणि ती प्रवाहाच्या दिशेने वाहात गेले. पाच वर्षांचा चिमुकला मित्र घरी गेला. आई घरी परतल्यावर मुलगी दिसली नाही म्हणून सर्वत्र शोध घेतला. पोलिसांनी ठिकठीकाणचे सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या मुलास विचारणा केली असता ती तर पाण्यात बुडाली. असे सांगतच पोलिस त्या दिशेने धावले. तिला पाण्यातून बाहेर काढले. मुलगी निपचित पडल्याचे पाहून आईने टाहो फोडला. मनाला चटका लावून जाणारी ही दुर्देवी घटना कामठीच्या येरखेडा परिसरात घडली. क्रिस्तीना मरकाम असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

मृतक मुलीची आई कावळापेठ येथे बिल कलेक्शनचे काम करते. तिला दोन मुली आहेत. एक साडेतीन वर्षांची तर दुसरी सहा वर्षांची क्रिस्तीना. आजी-आजोबसोबत येरखेडा परिसरात मरकाम कुटुंब राहते. घटनेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ख्रिस्तीना शाळेत गेली नाही. सकाळपासूनच घराजवळच्या पाच वर्षांच्या मुलासोबत खेळत होती. आई कामाला गेली होती. घरी आजी आजोबा होते. घरापासून केवळ अडीचशे मीटर अंतरावर एक नाला वाहतो. नदीचे पाणी सोडल्याने नाल्याचा प्रवाह वाढला आहे. नाल्यात स्वच्छ पाणी वाहते. त्यामुळे ख्रिस्तीना आणि शेजारचा मुलगा मातीचे गोळे बनवून खेळत होते.

सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास ख्रिस्तीनाचा पाय नाल्यात पडला. पाण्याच्या प्रवाहासोबतच ती वाहत गेली. खेळायला कोणी नाही म्हणून सोबतचा चिमुकला घरी निघुन गेला. ख्रिस्तीनाची आई घरी आली, परंतु तिला मुलगी दिसली नाही. सर्वत्र शोध घेतला. कुठेही थांगपत्ता लागला नाही. रात्री पोलिस ठाण्यात गेली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जवळपासची सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. मुले खेळताना सीसीटीव्हीत कैद झाले. त्यामुळे पोलिस त्या चिमुकल्याच्या घरी गेले. त्याची आस्थेनी विचारपूस केली. त्याने बोबड्या शब्दात जे काही सांगितले, साऱ्यांचे हृदयच धडधडले. ती पाण्यात बुडाली नंतर मी घरी गेलो. पोलिस लगेच पाण्याच्या दिशेने गेले. खाजगी लोकांच्या मदतीने पाण्यात शोध घेतला. काही दुर अंतरावर ख्रिस्तीनाला पाण्यातून काढण्यात आले. तिचे पार्थिव पाहून आईने टाहो फोडला.

– फाईल फोटो