Home Latest News दोघे खेळायला गेले, एक पाण्यात बुडाली, दुसरा घरी गेला

दोघे खेळायला गेले, एक पाण्यात बुडाली, दुसरा घरी गेला

0

<p><strong><img class&equals;"alignnone wp-image-11441 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;Death&lowbar;V&lowbar;jpg-1280x720-4g&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x450&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"450" &sol;><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; काळ आला अन्‌‍ खेळता खेळता जीव गेला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; कामठीच्या येरखेडा परिसरातील दुर्देवी घटना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सहा वर्षांच्या मुलीसोबत नियतिचा क्रूर खेळ<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>सकाळपासूनच दोघेही खेळत होते&period; ती शाळेतही गेली नाही&comma; नाल्याजवळ मातीचे गोळे बनवित होती&period; खेळता खेळता चिमुकलीचा पाय पाण्यात पडला आणि ती प्रवाहाच्या दिशेने वाहात गेले&period; पाच वर्षांचा चिमुकला मित्र घरी गेला&period; आई घरी परतल्यावर मुलगी दिसली नाही म्हणून सर्वत्र शोध घेतला&period; पोलिसांनी ठिकठीकाणचे सीसीटीव्ही तपासले&period; सीसीटीव्हीत कैद झालेल्या मुलास विचारणा केली असता ती तर पाण्यात बुडाली&period; असे सांगतच पोलिस त्या दिशेने धावले&period; तिला पाण्यातून बाहेर काढले&period; मुलगी निपचित पडल्याचे पाहून आईने टाहो फोडला&period; मनाला चटका लावून जाणारी ही दुर्देवी घटना कामठीच्या येरखेडा परिसरात घडली&period; क्रिस्तीना मरकाम असे मृत चिमुकलीचे नाव आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मृतक मुलीची आई कावळापेठ येथे बिल कलेक्शनचे काम करते&period; तिला दोन मुली आहेत&period; एक साडेतीन वर्षांची तर दुसरी सहा वर्षांची क्रिस्तीना&period; आजी-आजोबसोबत येरखेडा परिसरात मरकाम कुटुंब राहते&period; घटनेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ख्रिस्तीना शाळेत गेली नाही&period; सकाळपासूनच घराजवळच्या पाच वर्षांच्या मुलासोबत खेळत होती&period; आई कामाला गेली होती&period; घरी आजी आजोबा होते&period; घरापासून केवळ अडीचशे मीटर अंतरावर एक नाला वाहतो&period; नदीचे पाणी सोडल्याने नाल्याचा प्रवाह वाढला आहे&period; नाल्यात स्वच्छ पाणी वाहते&period; त्यामुळे ख्रिस्तीना आणि शेजारचा मुलगा मातीचे गोळे बनवून खेळत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास ख्रिस्तीनाचा पाय नाल्यात पडला&period; पाण्याच्या प्रवाहासोबतच ती वाहत गेली&period; खेळायला कोणी नाही म्हणून सोबतचा चिमुकला घरी निघुन गेला&period; ख्रिस्तीनाची आई घरी आली&comma; परंतु तिला मुलगी दिसली नाही&period; सर्वत्र शोध घेतला&period; कुठेही थांगपत्ता लागला नाही&period; रात्री पोलिस ठाण्यात गेली&period; वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जवळपासची सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले&period; मुले खेळताना सीसीटीव्हीत कैद झाले&period; त्यामुळे पोलिस त्या चिमुकल्याच्या घरी गेले&period; त्याची आस्थेनी विचारपूस केली&period; त्याने बोबड्या शब्दात जे काही सांगितले&comma; साऱ्यांचे हृदयच धडधडले&period; ती पाण्यात बुडाली नंतर मी घरी गेलो&period; पोलिस लगेच पाण्याच्या दिशेने गेले&period; खाजगी लोकांच्या मदतीने पाण्यात शोध घेतला&period; काही दुर अंतरावर ख्रिस्तीनाला पाण्यातून काढण्यात आले&period; तिचे पार्थिव पाहून आईने टाहो फोडला&period;<&sol;p>&NewLine;<h6><strong>&&num;8211&semi; फाईल फोटो<&sol;strong><&sol;h6>&NewLine;

Exit mobile version