spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुचाकी रोडावरच ठेवून पायदळ करावा लागतो प्रवास, सालवा येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचे पर्यायी मातीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष

किशोर साहू , मौदा :- खोपडी ते सालवा गावादरम्यान सालवा येथील रेल्वे फाटकावर मागील दोन वर्षापूर्वीपासून रेल्वे उडान पुलाचे काम अत्यंत कासववतीने सुरू असून, कंत्राटदाराने वाहनधारकासाठी तयार केलेला तात्पुरता पर्यायी रस्ता मातीचा असल्याने व त्यावर मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष असल्याने वाहनधारक त्रस्त असून दुचाकी रस्त्यावरच ठेवून वाहनधारकांना पायदळ प्रवास करावा लागत आहे. मागील तीन ते चार महिन्यापासून म्हणजेच पावसाळा सुरू झाल्यापासून,असाच प्रकार सुरू असून संबंधित प्रशासन विभागाने दुचाकी वाहनधारकांची गैरसोय दूर करावी, तसेच कंत्राटदार उडान पुलाचे बांधकाम करताना खड्ड्यांमध्ये भरण भरताना मुरमा ऐवजी संपूर्ण एनटीपीसीतून निघालेल्या राखेच्याच प्रयोग करत असल्याने उड्डाण पुलाच्या गुणवत्तेवर परिणाम तर होणार नाही ना? असा सवालही नागरिकांना पडला आहे.

Popular Articles