spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रस्ता मिळेना: शेतच स्मशानभूमीसाठी 3.32 एकर दान करण्याचा निर्णय – प्रमोद मोहोड

– शेतात जायला रस्ता नसल्यामुळे 3.32 एकर शेती स्मशान भूमीकरिता दान करण्याचा निर्णय

नागपूर :- मौजा आजनगाव पोस्ट मेंढेपठार तहसील काटोल जिल्हा नागपूर येथे प्रमोद पंजाबराव मोहोडशेत सर्वे क्रमांक 12 व सुभाष भाऊराव जीचकार शेत सर्वे क्रमांक 7 यांची शेती आहे या शेतात जाण्याकरिता आजनगाव ते लाखोळी कडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याला लागून राजश्री श्रीकांत जिचकार शेत सर्वे क्रमांक 3 व स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे धाकटे बंधू सुरेंद्र जिचकार शेत सर्वे क्रमांक 8आहे व या दोन्ही शेताच्या बांधावरून शेत रस्ता होता व त्याच रस्त्याने पूर्वी पाठीमागील शेताचे शेतकरी, मेट पांजरा रेल्वे स्टेशनला जाणारे प्रवासी व कोहळा गावातील गावकरी जात होते एवढेच नव्हे तर ब्रिटिश काळापासून या रस्त्याची नोंद सन 1912-13, 1977- 78 व 1986- 87 चा नकाशात, वाजीबुल अभिलेखात व राजश्री श्रीकांत जिचकार यांच्या शेत सर्वे क्रमांक 3 च्या सातबारा मध्ये देखील नोंद आहे. वरील दोघांनीही हा शेत रस्ता अडवून बांधाच्या मधातून जेसीबीने नाली खोदली व पूर्णतारीचे कंपाउंड केले ज्यामुळे आमच्या शेतात जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद केला तेव्हा तहसीलदार काटोल यांच्या कार्यालयात सुभाष जिचकार यांनी दिनांक 16 जानेवारी 2020 रोजी शेतात जाण्याकरिता बैलबंडीचा मार्ग मोकळा करून देण्याविषयी अर्ज केला ज्या अर्जात सुरेंद्र जिचकार यांनी अरेरावी व जोर जबरदस्ती करून रस्ता पूर्णपणे बंद केल्याचा उल्लेख करून देखील या अर्जाची साधी दखल देखील घेतली नाही याउलट जिचकार कुटुंबाचे वर्चस्व दाखवून सुभाष जिचकार यांना अधिकाऱ्यांनी देखील शांत बसण्याचा सल्ला दिला शेवटी नाईलाजाने सुभाष यांनी प्रयत्न करणे सोडले सुभाष जिचकार यांच्याच बांधावरून पुढे शेत सर्वे क्रमांक बाराचे शेतमालक प्रमोद मोहोड यांचा देखील रस्ता बंद झाला म्हणून त्यांनी देखील दिनांक 12 मार्च 2024 ला तहसीलदार यांचे कडे अर्ज केला यावर तहसीलदारांनी तब्बल 17 महिन्यानंतर शासकीय रस्ता मोकळा करण्याचा दिनांक 7 ऑक्टोंबर 2025 रोजी, आदेश दिला व भूमि अभिलेख कार्यालयास सीमांकन करून रस्ता मोकळा करण्याविषयी पत्र दिले जेव्हा की महसूल अधिनियमानुसार 90 दिवसाचे आत निर्णय देणे बंधनकारक आहे तहसीलदारांच्या पत्रानुसार भूमी अभिलेख विभागाने 16 डिसेंबर 2025 ला नोटीस काढली असता या नोटीस वर गैर अर्जदारांनी एसडीओकडे 23 डिसेंबर 2025 रोजी अपील केली त्याच दिवशी नोटरी व त्याच दिवशी अपीलावर एस डी ओ नी स्टे देखील दिला मात्र इतकी अविलंब कार्यवाही करणाऱ्या एसडीओ ने तब्बल 5 महिन्याने आदेश दिला की प्रकरण तहसीलदार काटोल यांना परत करण्यात येऊन उपरोक्त परिस्थिती लक्षात घेऊन तहसीलदार काटोल यांनी स्वतः मोका चौकशी करून सुधारित आदेश पारित करावे आता तहसीलदार यांचा सुधारित आदेश करिता पाच महिन्यापासून अभ्यास सुरू आहे आणि यांच्या अशा गैरवर्तनामुळे शेती पडीत आहे. जेव्हा की महसूल अधिनियम 1966 चे कलम 20 नुसार हा शेत रस्ता शासनाची मालमत्ता असून कलम 50 प्रमाणे केवळ सात दिवसाचा नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याचे अधिकार प्रशासनास आहे. एकीकडे शासन परिपत्रकात गाव नकाशावर दर्शविण्यात आलेले व शासकीय जागेत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण सात दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावा जर अतिक्रमण काढले नाही तर आधार कार्ड व फार्मर आयडी पाच वर्षापर्यंत ब्लॉक करण्यात यावा व कोणतेही शासकीय लाभ घेण्यात येऊ नये तर दुसऱ्या परिपत्रकात म्हणतात जर पूर्वीचा क्षेत्र असता असेल तर नवीन रस्ता मंजूर करू नये केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही केल्या जाईल. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती प्रमोद मोहोळ यांच्यापुढे निर्माण झाल्यामुळे स्मशानभूमी नसलेल्या आजनगाव (नागमोते) या गावात संपूर्ण शेती शासनास दान करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून गावाला स्मशानभूमी मिळेल व स्मशानभूमीत जाण्याकरिता का होईना शासकीय रस्ता मोकळा होईल व सुभाष जिचकार यांना शेतात जाण्याचा रस्ता मिळेल आणि या मार्गाने का होईना शेतपांधण रस्त्याचे स्वप्न साकार होईल. पत्रकार परिषदेला उपस्थित मंचावरील किसान मित्र फाउंडेशन काटोलचे संस्थापक प्रमोद मोहोड यांच्या अध्यक्षतेत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मंचावरील अश्विनी नागमोते (आजणगांवच्या सरपंच) आशा निहारे, सुभाष जिचकार व सुनील ढेंगरे, दिगांबर जिचकार उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.