नागपूर :- उपजीविका मार्फत आर्थिक दुर्बल ग्रामीण महिलांच्या संगोपणाचे उद्देश घेऊन मेळघाट येथील सोमवारखेळ या गावी आदिवासी महिलांना दिवाळी निमित्ताने साडीचोळी भेट देऊन उपजीविका भाऊभीज सोहळा नुकताच शनिवार 22 नोव्हेंबरला जि.प.उच्च प्राथमिक शाळा सोमवारखेळ येथे साजरा करण्यात आला. या सोहळ्या प्रसंगी गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील संपूर्ण भगिनी, बचत गटातील भगिनी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर अशा 351 भगिनींना साडीचोळी आणि स्वीट बॉक्स भेट, तसेच शाळेतील संपूर्ण मुलांनाही उपजीविका मार्फत शालेय साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद फुलला आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संस्थेचे हे सामाजिक कार्य परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे.
सदर सोहळयात गिराशे BEO, अल्का बोडे EO,भास्करे केंद्रप्रमुख, मंसाराम ठाकरे सरपंच, राजीव कोजरे मुख्याध्यापक, गावातील अन्य पदाधिकारी, तसेच उपजीविका चे पदाधिकारी धिरज गलगले अध्यक्ष, जयंत तुळणकर उपाध्यक्ष, विलास कडू कार्याध्यक्ष, संजय मार्कंडे सचिव, स्वप्नील बाराहाते सहसचिव, अनिल जवादे सदस्य, मनीष पाठरावे सदस्य, यांनी भगिनींना साडीचोळी ची भेट देऊन भाऊभीज साजरी केली. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. राजीव कोजरे तसेच संपूर्ण शिक्षकवृंद यांच्या यथक परिश्रमाने सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.








