– शिक्षणोत्सव २०२५ क्रीडा स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह द्विगुणित
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण व क्रीडा विभागातर्फे नागपूर विद्यापीठाच्या रविनगर येथील मैदानावर ‘शिक्षणोत्सव २०२५’ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहेत. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम घेण्यात येत आहे. ही क्रीडा स्पर्धा तीन दिवसीय असून, शुक्रवारी (ता. ०५) या स्पर्धेचा दुसरा दिवस होता. विविध खेळ खेळतांना खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला.
याप्रसंगी मनपा उपशिक्षणाधिकारी संजय दिघोरे, उपशिक्षणाधिकारी सीमा खोब्रागडे, उपशिक्षणाधिकारी सुभाष उपासे, विनय बगळे यांच्यासह इतर क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये महानगरपालिका शाळेचे ५ हजारावर विद्यार्थी सहभागी झाले असून, रस्सीखेच, कॅरम, कब्बडी, हर्डेल रेस, गोळाफेक, लांब उडी, क्रिकेट, बुद्धिबळ, खो-खोच्या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अभ्यासासोबत कौशल्य व प्रतिभा दाखविण्याची संधी मिळत आहे. विविध वयोगटातील मुलं-मुली या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेत असून, मुलांना लागणाऱ्या सर्व सोयी सुविधांचे विशेष नियोजन येते करण्यात आले आहे.

विविध स्पर्धेतील विजेते
४०० मीटर दौड यात १४ वर्षे मुली वयोगटात याचिका बावले ( प्रथम ), असमा शेख (द्वितीय) ,सोनम खारगोने (तृतीय) तर १४ वर्ष मुले या वयोगटात साजिद शेख (प्रथम) एमएके आझाद शाळा , यवन साहू (द्वितीय) नेताजी मार्किट, लक्ष्मण बनपेला ( तृतीय) संजय नगर शाळा यांनी बाजी मारली आहे.
४०० मीटर दौड यात १८ वर्ष मुली वयोगटात डॉली चौधरी (प्रथम) संजयनगर शाळा, रोशनी ठाकूर (द्वितीय) लाल बहादूर शाळा , मुस्कान उके (तृतीय) राम मनोहर लोहिया शाळा. तर १८ वर्ष मुले या वयोगट मध्ये मोहम्मद अन्ताफ (प्रथम) एम ए के आझाद शाळा,गणपत नाथ (द्वितीय) नेताजी मार्किट, दिपकर शियाल (तृतीय) वाल्मिकी नगर शाळा यांनी बाजी मारली आहे.
लांब उडी या खेळ प्रकारात १८ वर्ष मुली या वयोगटात आरुषी भौतेकर (प्रथम) वाल्मिकी नगर शाळा, मुस्कान उईके (द्वितीय) राम मनोहर लोहिया शाळा, श्रेया करवाडे (तृतीय) डॉ. आंबेडकर शाळा यांनी क्रमांक पटकाविला आहे.
क्रिकेट या खेळात १४ वर्ष मुले वयोगटात संजयनगर माध्यमिक शाळा (प्रथम), जीएन बनातवाला शाळा (द्वितीय), पारडी उच्च प्रा.शाळा (तृतीय) तर १८ वर्षे मुले संजयनगर माध्यमिक शाळा (प्रथम), डॉ. आंबेडकर ज्यु कॉलेज ( द्वितीय) आले आहेत. शनिवारी या क्रीडा स्पर्धेचा समारोप आहे.




