Home Latest News गट ग्रामपंचायत बोरी(घिवारी) येथे पॅरालीसीस रुग्णांना व्हीलचेअरच्या वाटपासह इतरही विविध उपक्रमांचे आयोजन

गट ग्रामपंचायत बोरी(घिवारी) येथे पॅरालीसीस रुग्णांना व्हीलचेअरच्या वाटपासह इतरही विविध उपक्रमांचे आयोजन

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> गट ग्रामपंचायत बोरी &lpar;घिवारी&rpar; च्या माध्यमातून गावातील नागरिकांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण&comma; लोकहिताचे आणि प्रत्यक्ष गरजांवर आधारित उपक्रम राबविण्यात येत आहेत&period; याचाच एक भाग म्हणून आज ग्रामपंचायत कार्यालय येथे पॅरालिसिस रुग्णांना व्हीलचेअरच्या वाटपासह भव्य मोफत आरोग्य शिबिर&comma;संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र तयार करून देणे&comma;पात्र नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड तयार करून देण्याचे कामही करण्यात आले&period; ग्रामपंचायतीच्या या एकत्रित सेवा उपक्रमामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाला विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाला&period;<&sol;p>&NewLine;<p>अनेक रुग्णांना चालणे-फिरणे कठीण होत असल्यामुळे दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता&period; अशा रुग्णांना आधार मिळावा&comma; त्यांना स्वतःचे काम स्वतः करता यावे&comma; थोडेफार फिरता यावे तसेच उपचारासाठी किंवा इतर कामांसाठी ये-जा करणे सुलभ व्हावे या सामाजिक भावनेतून ग्रामपंचायत तर्फे गावातील गरजू पॅरॅलिसिस अनेक रुग्णांना अनेक व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले&period; ग्रामपंचायतीचा हा उपक्रम केवळ मदत नसून गरजू नागरिकांना आत्मविश्वास आणि जगण्याचे बळ देणारा ठरत आहे&comma; असे सरपंच विशाल सेलोकर यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>सरपंच विशाल सेलोकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत नेहमीच इतरांपेक्षा वेगळे&comma; समाजोपयोगी आणि लोकांच्या थेट हिताचे उपक्रम राबवत असून गावातील प्रत्येक नागरिकाच्या सुख-दुःखात सहभागी राहण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे&period; &OpenCurlyDoubleQuote;गावाचा विकास फक्त रस्ते आणि इमारतींनी होत नाही&comma; तर गावातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचल्यावरच खरा विकास होतो&comma;” अशी भावनाही सरपंच सेलोकर यांनी यावेळी व्यक्त केली&period;तसेच इतरही विविध उपक्रमामुळे गरजू नागरिकांच्या वेळ&comma; श्रम व पैशाची बचत होत असल्याने गरजू नागरिकांनी ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे आभार मानले असून असे उपक्रम नियमित राबविण्यात यावे&comma; अशी भावना ही गरजू नागरिकांनी व्यक्त केली आहे<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी सरपंच विशाल सेलोकर&comma; उपसरपंच&comma; सदस्यगण &comma; ग्रामविकास अधिकारी वैभव बावनकर&comma; प्राथमिक आरोग्य कोदामेंढी येथील वैद्यकीय डॉ&period; समीक्षा महल्ले&comma; सी एच ओ विशाखा कावळे &comma; आरोग्य सहाय्यक वैद्य&comma; आरोग्य सेवक मधुकर राऊत&comma; आशा सेविका रंजना चवळे&comma; डाटा ऑपरेटर प्रवीण भुते&comma; सीआरपी अश्विनी गोंधुळे &comma; अंगणवाडी सेविका दामिनी तिजारे&comma; ग्रा&period;पं&period;सोशल मिडिया हॅंडलर अनुज खंडाईत&comma; ग्रामपंचायत कर्मचारी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version