किशोर साहू, मौदा, ता. २७ :- दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदा माता उत्सव मंडळ निमखेडा (बानोर) येथे शारदा मातेची स्थापना करून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला परिसरातील व तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर भेटी देऊन प्रोत्साहन देत असून सहकार्य करीत आहे. शनिवार (दि. 25 ऑक्टोबर)ला महाप्रसादाचे मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी जि प सदस्य कैलास बरबटे , भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे , महामंत्री कैलास सोमनाथे, चाचेर निमखेडा जि प सर्कल मधील राज्यमंत्री एडवोकेट आशिष जयस्वाल यांचे स्वीय सहाय्यक विकास झाडे ,भोजराज दुबे , उत्तम लेंडे, राजु भोयर, अनिल भोयर,अभिषेक अमृते,अखिलेश अमृते उपस्थित राहून कार्यक्रमाला सहकार्य करून महाप्रसादाच्या लाभ घेतला.




